शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Lok Sabha Election 2019 चिक्कोडी कुरुक्षेत्रावर हुक्केरी विरूद्ध ज्वोल्ले लक्षवेधी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:42 IST

विलास घोरपडे । लोकमत न्यूज नेटवर्क संकेश्वर : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. मात्र, खरा ...

विलास घोरपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसंकेश्वर : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. मात्र, खरा सामना काँगे्रसचे प्रकाश हुक्केरी विरूद्ध भाजपचे आण्णासाहेब ज्वोल्ले यांच्यातच रंगणार आहे. आठवडाभराचा कालावधी मतदानास शिल्लक असल्याने कमी वेळेत मतदारापर्यंत पोहोचण्यास दोन्ही पक्षांत चढाओढ सुरू आहे.कडोली (ता. बेळगाव) ते ऐगणी (ता.अथणी) असा लांब पल्ल्याचा अंतर असणाऱ्या क्षेत्रात ८ विधानसभेचे कार्यक्षेत्र आहेत. त्यात भाजप व काँगे्रस प्रत्येकी ४ समसमान पक्षीय बलाबल आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत काँगे्रसचे प्रकाश हुक्केरी यांनी भाजपचे रमेश कत्ती यांचा ३००३ मतांनी पराभव केला होता. सन २००९ पासून हा मतदारसंघ राखीव प्रभागातून जनरल झाल्याने ‘खासदार’कीसाठी इच्छुकांत वाढ झाली.सन २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश हुक्केरी यांनी तर २०१३ मध्ये गणेश हुक्केरी या पिता पुत्रांनी भाजपच्या ज्वोल्लेंना पराभवाची चव चाखायला लावली आहे. मात्र, सध्या संबंधितांच्या घरी एक-एक आमदारही (गणेश हुक्केरी-चिक्कोडी, शशिकला ज्वोल्ले-निपाणी) असल्याने या निवडणुकीत ‘खासदारकी’साठी दोघांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.मतदारसंघात एकूण १५,७९३०९ मतदार आहेत. प्रमुख लढत हुक्केरी व ज्वोल्ले यांच्यात असून दोघे लिंगायत धर्माचे आहेत. या मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या अधिक असल्याने मतविभागणी होण्याची शक्यता अधिक आहे. काँगे्रसची मतदार दलित अल्पसंख्याक तर कर्नाटकात लिंगायतांची मते भाजपची व्होटबँक मानलीजाते.अशावेळी मराठा समाजाची २ लाख १२ हजार मते कुणाकडे जाणार यावर विजयाचे चित्र ठरणारआहे.बहुचर्चित भाजपची उमेदवारी मिळविण्यात आण्णासाहेब ज्वोल्लेंनी बाजी मारली असली तरी याच उमेदवारीवरून भाजपच्या गोटात अंतर्गत असंतोष वाढला आहे. याउलट खासदार हुक्केरी हे चिक्कोडी भाग वगळता ५ वर्षांत लोकसंपर्क ठेवण्यात अपयशी ठरल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे काही ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागणार आहे. एकंदरीत कोणाला निवडून आणण्याऐवजी नेमके कोणाला पाडायचे याची दबक्या आवाजात चर्चा रंगल्याने यामुळे पक्षाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारण महत्त्वाचे ठरणार आहे.चिक्कोडीचेआजपर्यंतचे खासदार४१९५७ - दत्ता कट्टी (रिपब्लिकन)४१९६२ - व्ही. एल. पाटील (काँगे्रस)४१९६७-१९९५- बी. शंकरानंद (काँगे्रस)४१९९६ - श्रीमती रत्नमाला शावनूर(जनता दल)४१९९८- रमेश जिगजिनगी (लोकशक्ती)४१९९९- रमेश जिगजिगी (निधर्मी जनता दल)४२००४ - रमेश जिगजिनगी (भाजपा)४२००९ - रमेश कत्ती (भाजपा)४२०१४ - प्रकाश हुक्केरी (काँगे्रस)सलग २८ वर्षे खासदारकी१९६७ ते १९९५ मध्ये झालेल्या लोकसभेच्या ७ निवडणुकीत विजय मिळवून सलग २८ वर्षे चिक्कोडीची खासदारकी भूषविण्याचा मान काँगे्रसचे बी. शंकरानंद यांना जातो. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांना केंद्रीय मंत्रीपदही दिले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक