शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 बेळगावात दुरंगी; मतदारांत निरूत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:36 IST

प्रकाश बेळगोजी । लोकमत न्यूज नेटवर्क बेळगाव : कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील १४ जागांसाठी मतदानाची पहिली फेरी संपली असून २३ ...

प्रकाश बेळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील १४ जागांसाठी मतदानाची पहिली फेरी संपली असून २३ एप्रिलला होणाऱ्या दुसºया टप्प्यातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व चिक्कोडी या दोन मतदारसंघांत मतदान केवळ चार दिवसांवर येऊन ठेपले असताना जनतेमध्ये निरूत्साहाचे वातावरण आहे.भाजपचे बेळगावचे विद्यमान खासदार सुरेश अंगडी हे चौथ्यावेळी रिंगणात असून त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचे पाठबळ नसल्याने बेळगाव शहरात प्रचार सभा, फेºया घेणे टाळले आहे. स्वपक्षातील कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध असल्याने शहरातील अनेक मोठ्या गल्ल्यांतून त्यांच्याबद्दलच्या नाराजीचा सुरू दिसून येतो. अंगडी यांनी आतापर्यंत आमचा उपयोग करून घेतला आहे, असा आरोप अनेक तरुण कार्यकर्ते करताना दिसतात. केवळ आपला उपयोगच निवडणुकीपुरतीच करून घेतात नंतर आमच्यावर संकट आल्यानंतर मात्र पाठ फिरवतात. यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या सामोरे जाणे टाळले आहे.जनाधार मिळवण्यासाठी सुरेश अंगडी यांचा खटाटोप सुरू असून त्यांनी यासाठी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घेतला आहे. अंगडी यांचे समर्थक ‘मोदी जरूरी अन अंगडी मजबुरी’ असा नारा देत आहेत. मात्र, आश्चर्य म्हणजे सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुरेश अंगडी यांच्यामागे जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेता त्यांच्या प्रचारासाठी पुढे येताना दिसत नाही. इतकेच काय तर आरएसएसच्या अंतर्गत विरोध असल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे मोदी यांची सभा बेळगावऐवजी चिक्कोडीला घेण्यात जिल्ह्यातील बड्या नेत्यांचं राजकारण आहे, अशीदेखील चर्चा आहे तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभादेखील योगी यांच्यावरील बंदीमुळे होऊ शकली नाही त्यामुळे ते नाराज आहेत. अंगडी यांनी केंद्र सरकारच्या अनेक योजनांची जाहिरातबाजी करून त्यांनी श्रेय मिळवण्याचा खटाटोप केला होता. त्याचीदेखील कुणी फारशी दखल घेतली नाही.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने ४५ उमेदवार आहेत हे उमेदवार देखील बºयापैकी मते खाणार असून त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची चिंता वाढली आहे. समितीच्या उमेदवारांनी प्रचारफेरीत आघाडी घेतली नसली तरी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. काँग्रेसच्यावतीने बेळगाव मतदारसंघात डॉ. व्ही. एस. साधूनावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते मूळचे बैलहोंगलचे असून के. एल. ई संस्थेचे संचालक आहेत.पंचमसाली लिंगायत समाजातील एक मोठा चेहरा आहेत मात्र बेळगाव भागात त्यांची ओळख नाही. तो नवीन चेहरा असल्याने त्यांची भिस्त बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग भागावर आहे. बेळगाव भागात काँग्रेस पिछाडीवर असण्याचे मुख्य कारण म्हणजे बेळगाव भागात संपर्क अभाव आहे लोकांत ते परिचित नाही. एकूणच बेळगावची निवडणूक दुरंगी होत असून कोण बाजी मारतंय पाहावे लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक