शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २८ शाळांना कुलूप

By admin | Updated: February 26, 2016 01:23 IST

प्रस्ताव शासनाकडे : जूनपासून अंमलबजावणी; शिक्षक अतिरिक्त होणार

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील पाच पटसंख्या असलेल्या २८ द्विशिक्षकी शाळा पहिल्या टप्प्यात बंद होऊन त्यांना कुलूप लागणार आहे. या शाळा बंद झाल्यास ५४ शिक्षक अतिरक्त होणार आहेत. बंद शाळांतील विद्यार्थ्यांच्या मोफत वाहतुकीची सोय करून त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने २० पटांखालील ४०७ शाळा बंद करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण २००५ शाळा आहेत. दरम्यान, नोकरी-व्यवसायानिमित्त शहरातील वास्तव्य, पालकांचा पाल्यास इंग्रजी शाळेत घालण्याचा वाढता कल, जिल्हा परिषदेच्या काही शाळांतील घसरलेली गुणवत्ता, प्राथमिक शिक्षकांचे शिकविण्यापेक्षा राजकारण व अन्य गोष्टींकडे विशेष लक्षामुळे अध्यापनाकडे होणारे दुर्लक्ष, आदी कारणांमुळे पटसंख्या घटते आहे. अनेक प्राथमिक शाळांतील शिक्षकांची मुलेही खासगी शाळांमध्ये जात आहेत. यामुळे पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एक विद्यार्थी असलेल्या गावांत, वाड्या-वस्त्यांवर द्विशिक्षकी शाळा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दुर्गम, डोंगराळसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रत्येक मुलास शिक्षण मिळावे, हा उद्देश असल्यामुळे शाळा सुरू आहेत. प्राथमिक शिक्षण प्रशासनाने घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४०७ शाळांत २० पटाच्या आत विद्यार्थी आहेत. पाच पटसंख्येच्या आतील २७, दहा पटसंख्येच्या आतील १०२, पंधरा पटासंख्येच्या आतील २७७ शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोपनीयपणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून पाच पटसंख्येच्या आतील शाळांची माहिती घेऊन जूनमध्ये त्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. वीस पटाखाली शाळाही बंद केल्यास तब्बल आठशे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. बंद होणाऱ्या सर्व शाळा वाड्या-वस्त्यांवरील असल्याने गरीब, सामान्य कुटुंबांतील मुलांना त्याचा फटका बसणार आहे. जवळच्या शाळेत जाण्या-येण्याची सोय केली तरी गावापासून लांब जावे लागणार असल्याचे शल्य पालकांमध्ये आहे.