शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठांचे ‘लॉबिंग’, कनिष्ठांची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे प्रकरणानंतर पोलीस अधिकाऱ्यांतील अंतर्गत ‘लॉबिंग’ची खदखद चव्हाट्यावर आली. त्यामुळे जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे प्रकरणानंतर पोलीस अधिकाऱ्यांतील अंतर्गत ‘लॉबिंग’ची खदखद चव्हाट्यावर आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्याऐवजी डागाळू लागली. अर्थकारणाच्या उद्देशाने जिल्ह्यात आलेल्या काही वरिष्ठांची इच्छापूर्ती होत नसल्याने ते आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गळचेपी करत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच खाकी वर्दीत लपलेले काहींचे मुखवटे समाजासमोर येत आहेत.

दोन-अडीच वर्षांत जिल्ह्यात अवैध व्यवसायांना खीळ बसली असली तरीही ते पूर्णत: बंद आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. तत्कालीन व विद्यमान पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसाय बंदचे आटोकाट प्रयत्न केले, तरीही काही वरिष्ठांच्या आशीर्वादाने दारू, मटका, गुटखा, ऑनलाईन बेटिंग आदी राजरोसपणे सुरूचे चित्र आहे. पो. नि. काळे यांचा आत्महत्येचा प्रयत्न करणारा मेसेज धक्कादायक आहे. त्यामुळे पोलीस दलातही नाराज व खूश असे अधिकाऱ्यांचे दोन गट चर्चेला आले.

‘कलेक्टर’ची बदली, फक्त कागदोपत्री

बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये डी. बी. पथक, गोपनीय व दप्तरी गटांतील काही साहेबांचे लाळघोटे असतात. हेच मर्जीतील ‘तोडपाणी’ करतात. तेच फक्त ‘कलेक्टर’ची भूमिका बजावतात. त्यांची बदली झाली तरीही साहेब स्वत:च्या फायद्यासाठी त्यांना लवकर सोडत नाहीत शिवाय कामाविना फक्त रूबाब मारणारेही काही पोलीस आहेत, यामुळे काही कर्मचाऱ्यांवर कामाचा नेहमीच बोजा दिसतो. त्यातून कर्मचाऱ्यांत व अधिकाऱ्यांत दरी रुंदावते.

वरिष्ठांवर हात उचलणाऱ्यांना अभय

रात्री दोघा मद्यधुंद पोलिसांनी गस्तीवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला; पण दोघाही पोलिसांनी अनेकदा ‘कलेक्टर’ची भूमिका बजावल्याने त्यांच्यावर फक्त मुख्यालयातच बदलीची कारवाई झाली. हेच कृत्य इतर पोलिसांकडून घडले असते तर.. ! अशा प्रवृतीमुळे खात्यात अंतर्गत वाद वाढत आहेत. राजारामपुरी पोलिसांत तर दोन वर्षांपूर्वी अधिकाऱ्यानेच केबिनवर हक्क बजावण्यासाठी चक्क हजेरी मास्तर पोलिसालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविले होते.

अधिकाऱ्याने करून घेतली बदली

काळे यांनी क्राइम ग्रुपवर टाकलेल्या मेसेजचे प्रकरण ताजे असतानाच आर्थिक गुन्हे शाखेतील एका पोलीस निरीक्षकानेही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विशेष पोलीस महानिरीक्षकांना विनंती करून आपली बदली सातारा येथे दोन दिवसांपूर्वी करून घेतली तसा त्यांनी धाडसी संदेश पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठविला.

वरिष्ठांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक

अधिकारी हे निवृत्तीकडे झुकलेले असतात, त्यांनाही मान, अपमान, कौटुुंबीक अडचणी असतात. परजिल्ह्यांतून आलेल्या काही वरिष्ठांना कनिष्ठ अधिकाऱ्यांचे घेणे-देणे नसते. शिस्तीच्या नावाखाली कनिष्ठ अधिकाऱ्यांची घुसमट होते. त्यांच्या विनंत्यांचा विचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे.