शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

थेट पाणी योजनेचा प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: August 13, 2014 23:30 IST

काळम्मावाडी पाणी योजना शंभर टक्के अनुदानावर पूर्ण करावी : इचलकरंजी पालिकेच्या विशेष सभेची मागणी

इचलकरंजी : शहरात शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी ६३१.८५ कोटी रुपयांची काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी योजना सरकारने शंभर टक्के अनुदानावर पूर्ण करावी, अशा आशयाचा प्रस्ताव आज (बुधवारी) नगरपालिकेच्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.नगराध्यक्षा बिरंजे यांनी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणाऱ्या योजनेचा आराखडा मंजूर करून तो केंद्र व राज्य सरकारला सादर करण्याच्या विषयावर विशेष सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरूवातीला प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या एनजेएस इंजिनिअर्स या संस्थेचे अभियंते एस.जे.सोनटक्के यांनी नळ योजनेविषयी माहिती दिली.काळम्मावाडी नळ योजनेसाठी सन २०३६ पर्यंत एक टप्पा व सन २०५१ पर्यंत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत अनुक्रमे ३.६८ लाख लोकसंख्या व ८ लाख लोकसंख्या गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यावेळी अनुक्रमे पाण्याची गरज दररोज ४९.७२ दशलक्ष लिटर व १०८ दशलक्ष लिटर गृहीत धरली आहे. त्यामध्ये औद्योगिक पाणी दहा दशलक्ष लिटर व सोळा दशलक्ष लिटर, व्यावसायिक ३.१८ व ५.७६, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी १.३८ व ३ याशिवाय गळती आणि वितरणातील गळतीचा तोटा असा गृहीत धरला आहे. योजनेमध्ये काळम्मावाडी धरणातील जलाशयात उभारण्यात येणारे उपसा केंद्र, जॅकवेल व पुरवठा विहिर, पंपगृह, पाण्याची उंच टाकी आणि दीड मीटर व्यासाची ८३.४० किलोमीटर लांबीची दाबनलिका यांचा अंतर्भाव आहे. दाबनलिकेतून पाणी येत असताना ते दूधगंगा नदीवर तीन ठिकाणी व पंचगंगा नदीवर एक ठिकाणी वरून जात असल्याने त्यासाठी पूल बांधण्यात येणार आहे. ३७ किलोमीटरची दाबनलिका जमिनीखालून व उर्वरित दाबनलिका जमिनीवरून जोडली जाणार आहे. याशिवाय केनवडे घाटामध्ये एका बोगद्याची तरतूद करण्यात आली आहे. दाबनलिकेच्या देखभालीसाठी दोन चौक्यांचीही तरतूद आहे.धरणामध्ये इनटेक विहिर, निरीक्षण विहिर, नळ, जोड कालवा, कॉफर डॅम, जॅकवेल, पंपगृह व संपर्क सेतू यावर ७१ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये खर्च येणार आहे. विद्युतीकरण व यांत्रिक कामासाठी १४ कोटी २० लाख ५० हजार रुपये, पंपगृहाच्या दाबनलिकेसाठी ५ कोटी २५ लाख ३० हजार रुपये, उंच टाकीसाठी १ कोटी ७४ लाख, गुरूत्त्व दाबनलिकेसाठी ४९७ कोटी ८१ लाख ७० हजार रुपये, विद्युत पुरवठा गृहासाठी पाच कोटी रुपये आणि त्यास सलग्न असणाऱ्या भू-संपादन, कर्मचारी निवासस्थान, पीक नुकसान भरपाई, परवाना, आदींसाठी ८ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये असा ६०४ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपये खर्च येणार आहे. त्याचबरोबर आस्थापना व साहित्य खर्चाकरीता १२ कोटी ३९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकूण ६३१.८५ कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे. योजना सादर झाल्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये शशांक बावचकर, भीमराव अतिग्रे, रणजित जाधव, अजित जाधव, तानाजी पोवार, अशोकराव जांभळे, सयाजी चव्हाण, बाळासाहेब कलागते, संजय कांबळे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)देखभाल खर्च ९.८७ कोटी योजना कायमस्वरुपी चालविण्याकरीता व्यवस्थापक म्हणून एक उपअभियंता, पर्यवेक्षक म्हणून एक शाखा अभियंता, चार फिटर, दोन वेल्डर, एक जीप चालक, दोन वायरमन, दोन मेकॅनिक, सहा मदतनीस, चार पंपचालक व चार वॉचमन यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे दरवर्षी देखभालीचा खर्च ३ कोटी २० लाख रुपये आणि चालविण्याचा खर्च ६ कोटी ६८ लाख रुपये असा एकूण ९ कोटी ८७ लाख रुपये अपेक्षित आहे.काळम्मावाडी नळ योजनेसाठी सन २०३६ पर्यंत एक टप्पा व सन २०५१ पर्यंत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत अनुक्रमे ३.६८ लाख लोकसंख्या व ८ लाख लोकसंख्या गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ३७ किलोमीटरची दाबनलिका जमिनीखालून व उर्वरित दाबनलिका जमिनीवरून जोडली जाणार आहे.