शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थेट ‘भेट’ आणखी दीड वर्षांनी

By admin | Updated: May 28, 2016 00:49 IST

काळम्मावाडी योजना : तीन स्तरांवर काम सुरू; विविध परवानग्या मिळाल्याने गती

थेट ‘भेट’ आणखी दीड वर्षांनीकाळम्मावाडी योजना : तीन स्तरांवर काम सुरू; विविध परवानग्या मिळाल्याने गतीकोल्हापूर : शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पुढच्या दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. सध्या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा कामात खंड पडण्याची शक्यता आहे. प्रारंभी विविध विभागांच्या परवानगी मिळण्यास झालेला विलंब, ग्रामस्थांचा विरोध, तांत्रिक अडचणींतून आता कुठे योजनेच्या कामाने गती घेतली आहे. कोल्हापुरातील पुईखडी ते राजापूर अशी ५२.४ किलोमीटरच्या अंतरात १८०० एम.एम.जाडीची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यापैकी १५ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याशिवाय शहर हद्दीत १३.५० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. उर्वरित जलवाहिनी टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. जलवाहिनी टाकण्याबरोबरच राजापूरवाडी येथे जॅकवेल उभारण्याचे कामही एप्रिलपासून सुरू झाले आहे. वनविभागाची परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हे काम उशिरा सुरू झाले. सध्या जॅकवेल उभारणीच्या कामात ११ पोकलँड, ४ ब्रेकर, १४ डंपर्स, २ रोलर अशा यंत्रणेसह आवश्यक तो कर्मचारी वर्ग कामात व्यस्त आहे. चौदा मीटर व्यासाचे आणि ४० मीटर खोलीचे या जॅकवेल शेजारीच ३६ बाय २४ आकाराचे पंप हाऊस उभारण्यात येत आहे. धरणातील पाणी इंटकवेलद्वारे जॅकवेलमध्ये घेऊन उपसा करून एका पाण्याच्या टाकीत घेण्यात येणार आहे आणि तेथून ते नैसर्गिक दाबाने पुईखडीपर्यंत आणले जाणार आहे. पुईखडी येथे सध्या ५० एमएलडी पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा कार्यान्वित आहे, आता नव्या योजनेद्वारे आणखी ८० एमएलडी पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी आठ बेड तयार केले जात आहेत. त्याचे कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, परिवहन समिती सभापती लाला भोसले तसेच स्थायी समितीचे सदस्य अजित ठाणेकर, सुनील पाटील, भूपाल शेटे, रिना कांबळे, सूरमंजिरी लाटकर, दीपा मगदूम, मनीषा कुंभार, रूपाराणी निकम, उमा इंगळे, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, आदींनी या योजनेच्या कामाची शुक्रवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)मुदत वाढवावी लागणारकाळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची मुदत ३० महिन्यांची आहे. २४ आॅगस्ट २०१४ रोजी संबंधित कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हायला सात ते आठ महिन्यांचा विलंब झाला. फेबु्रवारी २०१७ मध्ये कामाची मुदत संपणार आहे; पण त्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे किमान एकवर्ष तरी मुदत वाढवून द्यावी लागणार आहे. काहीही करून हे काम डिसेंबर २०१७ मध्ये संपवावे, असा अधिकाऱ्यांचा निर्धार आहे.