शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या गव्यांच्या कळपास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:02 IST

गगनबावडा : भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी (ता. गगनबावडा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. चौवीस तासांपेक्षा जास्तकाळ गव्यांना पाण्यात काढावे लागले.बुवाचीवाडी येथील विठ्ठल भूतल यांच्या शेतामध्ये विहीर आहे. या विहिरीवर शनिवारी मध्यरात्री गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी अचानकपणे पाच ...

गगनबावडा : भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी (ता. गगनबावडा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. चौवीस तासांपेक्षा जास्तकाळ गव्यांना पाण्यात काढावे लागले.बुवाचीवाडी येथील विठ्ठल भूतल यांच्या शेतामध्ये विहीर आहे. या विहिरीवर शनिवारी मध्यरात्री गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी अचानकपणे पाच गवे विहिरीत कोसळले. विठ्ठल भूतल हे रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी आले होते.यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याची वर्दी वनविभागाला मिळताच गगनबावड्याचे वन क्षेत्रपाल पी. एस. पाटील यांनी एकूण १५ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीचा गाळ असल्याने त्यामध्ये हे पाच गवे रुतून बसले होते. शिवाय विहिरीचा भाग आतपर्यंत खोल असल्याने या गव्यांची विहिरीबाहेर येण्याची केविलवाणी धडपड सुरू होती. गव्यांचे वजनदेखील अधिक असल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. दुसºया दिवशी सकाळी याठिकाणी जेसीबी मागवून विहिरीचा काही भाग काढून गव्यांना बाहेर येण्यासाठी वाट करण्यात आली. यानंतर हे पाचही गवे विहिरीबाहेर आले.