शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

साहित्य चळवळ झाली पुन्हा प्रगल्भ

By admin | Updated: December 15, 2014 23:58 IST

पोलंडवासियांचा ऋणानुबंध..

कोल्हापूरच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीसाठी यंदाचे वर्ष अतिशय उत्साहदायक ठरले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे नुतनीकरण, विविध महोत्सव..संगीत मैफली, आणि राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्राने मारलेली मुसंडी यामुळे सांस्कृतिक क्षेत्राला उभारी मिळाली आहे. मात्र, लाखो भाविकांवर आपली कृपादृष्टी ठेवणाऱ्या अंबाबाई मंदिराचा आणि कोल्हापूरच्या चित्रपरंपरेतला शेवटचा किरण असलेल्या चित्रनगरीच्या विकासाच्या नुसत्याच चर्चा रंगल्या. ग्रंथ महोत्सव, कलामहोत्सव, गायन समाज देवल क्लबमध्ये रंगणाऱ्या संगीत मैफली, पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, गुणीदास फौंडेशनचे सांगितीक कार्यक्रम.., विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन, शाहू स्मारक भवनच्या कलादालन हाऊसफुल्ल करणारे चित्र-शिल्प प्रदर्शन, वसुंधरा फिल्म फेस्टिवल, चित्रपट साक्षर प्रेक्षक घडविण्यासाठी खास शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली चिल्लर पार्टी, विद्यार्थी चित्रपट चळवळ या सगळ््या सांस्कृतिक चळवळींनी आणि घडामोडींनी कोल्हापूरच्या कलापरंपरेचे आम्हीच खरे वारसदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. एकच प्याला नाटकाचे सलग १४ तास सादरीकरण करून प्रतिज्ञा नाट्यरंगने नवा विक्रम प्रस्थापित केला. प्राथमिक केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या कोल्हापूर केंद्रावर तब्बल १८ नाटकांचे सादरीकरण झाले. मात्र, कोल्हापुरातील मराठी चित्रपटसृष्टीला हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. त्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील राजकारणाने कधी नव्ह,े ती निचतम पातळी गाठली. पोलंडवासियांचा ऋणानुबंध..दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आश्रयाला आलेल्या पोलंडवासियांनी मार्च महिन्यात कोल्हापूरशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. पोलंडच्यावतीने कोल्हापुरात निधन झालेल्या व्यक्तींच्या दफनभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या सर्व घटनांच्या एकमेव साक्षीदार असलेल्या वांड्रा काशीकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वज्रलेपाचा वाद मिटण्याची आशा चौदा वर्षांपासून न्यायालयीन वादात अडकलेला करवीर निवासिनी अंबाबाईच्या वज्रलेपाचा वाद यावर्षी वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग झाल्याने हा प्रश्न मिटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. (उद्याच्या अंकात शिक्षण) पंचंगगा घाटावरचा अनमोल ठेवापंचगंगा नदी घाट म्हणजे कोल्हापूरच्या धार्मिक आणि इतिहासकालीन घटनांचा साक्षीदार उन्हाळ््यात नदी पात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने तब्बल ४२ वर्षांनी छत्रपती घराण्याची समाधी मंदिरे, भग्न झालेले कार्तिकेयाचे मंदिर, दशाश्वमेध घाट या प्राचीन वास्तू पाहण्याची संधी कोल्हापूरकरांसह पर्यटकांना मिळाली. इंदुमती गणेश