शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत दीड टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९१ वा रविवार असून, ...

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९१ वा रविवार असून, एनएसएसचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. या मोहिमेत तीन जेसीबी, सहा डंपर, दोन आरसी गाड्या, तीन औषध फवारणी व दोन पाणी टँकर, १५० कर्मचारी सहभागी झाले होते.

--------------------------------------------------------------------

साखर कामगारांची पगारवाढ लवकरच

यड्राव (जि. कोल्हापूर) : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी गठित केली असून, पगारवाढीचा निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रातिनिधिक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली. साखर कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यातील साखर कारखाना कामगार संघटना व साखर कारखान्यांना शिष्टमंडळासह भेटी सुरू आहेत. यावेळी काळे यांनी ही माहिती दिली.

--------------------------------------------------------------------

तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत ट्रॅक्टर पडून मृत्यू

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : तालुक्यातील बनेवाडी येथे अनवधानाने विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने तेजस श्रीरंग माळी (वय ३) या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्रीरंग माळी सायंकाळी दोन मुलांसह वस्तीजवळ मळ्यात गेले होते. ट्रॅक्टर विहिरीसमोर लावल्यानंतर मुलांना ट्रॅक्टरवरच पुढे बसवून माळी मळ्यात गेले. दोघांपैकी एका मुलाचा क्लचवर पाय पडल्याने ट्रॅक्टर उताराने पुढे जाऊ लागला. मोठ्या मुलाने कशीबशी उडी मारली; परंतु तेजससह ट्रॅक्टर विहिरीत पडला. तेजसचा बुडून मृत्यू झाला.

--------------------------------------------------------------------

शिधापत्रिकेला आधार लिंक नसल्यास धान्य होणार बंद

सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ ही देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक या मुदतीत लिंक होणार नाहीत, त्यांना १ फेब्रुवारी २०२१ पासून सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

--------------------------------------------------------------------

साताऱ्यातील गोडोली चौक अतिक्रमणमुक्त

सातारा : अनेक महिन्यांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या सातार्‍यातील गोडोली चौकाने मोकळा श्वास घेतला. सातारा पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रस्त्यावरील सर्व हातगाड्या व अतिक्रमणे हटविल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

--------------------------------------------------------------------

तब्बल ६७५ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : निधीअभावी जिल्हा परिषदेच्या सुमारे ६७५ प्राथमिक शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा नियोजनमधून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात शाळा दुरुस्ती आणि नव्या वर्गखोल्यांसाठी १३ कोटी ७३ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे शाळा मोडकळीस आल्या असतानाच अन्यत्र दुसरीकडे शाळा सुरू करण्यात येत आहेत. निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या इमारतींची विशेषत: शाळांची मोठी हानी झाली. त्यातच अनेक वर्षे निधी न मिळाल्याने दुरुस्ती प्रलंबित आहे.

--------------------------------------------------------------------

इन्सुलीतील दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : शेळ्या चरावयास घेऊन जात असताना वाटेत अडवून दोघा बहिणींशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी इन्सुलीतील दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दीपक नाईक (वय २४) व अनिल विष्णू राऊळ (३७, दोघेही रा. इन्सुली गावठणवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघाही संशयितांना बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

--------------------------------------------------------------------

दूरसंचारच्या नेटवर्कचा परुळेत बोजवारा

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग): परुळेच्या आठवडा बाजाराच्या निमित्ताने बँक व इतर शासकीय कामांसाठी आलेल्या ग्राहकांची दूरसंचार नेटवर्क नसल्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. सकाळपासूनच दूरसंचारचे नेटवर्क बंद झाल्याने सर्वच बँकांचे कामकाज ठप्प झाले. आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक आले होते.