चंदगड पंचायत समितीच्यावतीने बदलीनिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती ॲड. अनंत कांबळे होते. यावेळी जाधव यांचा सपत्निक सत्कार केला.
यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी, जाधव यांनी केवळ आपल्या कामापुरते मर्यादित न राहता तालुक्यातील गावकामगार ते उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी जोडलेली नाळ याविषयी माहिती दिली.
यावेळी ॲड. कांबळे, माजी सभापती शांताराम पाटील, सदस्य दयानंद काणेकर, बबनराव देसाई, संजय चंदगडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसभापती मनीषा शिवणगेकर, विठाबाई मुरकुटे, रूपा खांडेकर, नंदिनी पाटील यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. एम. टी. कांबळे यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
चंदगड येथे कृषी अधिकारी संतोष जाधव यांचा सपत्निक सत्कार ॲड. अनंत कांबळे यांनी केला. यावेळी उपसभापती मनीषा शिवनगेकर व इतर सदस्य उपस्थित होते.
क्रमांक : ०३०९२०२१-गड-०५