शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पेंटर चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात गणेशने भरले आनंदाचे रंग

By admin | Updated: July 26, 2014 00:45 IST

कर्तृत्वाचा झेंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले;

गणपती कोळी- कुरुंदवाडकोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील गणेश माळीने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले; तर पोरांचं स्वप्न साकार होण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात बांध खुरपणाऱ्या आई अनिता यांच्या हातात यशाचे क्षितिज आणून दिले आहे; पण आपल्या मुलग्याने केलेला पराक्रम त्यांच्या गावीही नव्हता. आज, शुक्रवारी पहाटे तीन वाजता गणेश माळीने कांस्यपदक मिळविले. आज सकाळी ही वार्ता कुरुंदवाड आणि परिसरात पसरताच गणेशच्या आई-वडिलांचे अभिनंदन करायला नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, चंद्रकांत माळी आजही पेंटिंगसाठी, तर आई मोलमजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या.कुरुंदवाड येथे दोन खोल्यांच्या साध्या कौलारू घरात माळी कुटुंब वास्तव्यास आहे. चंद्रकांत हे बिल्डिंग पेंटर म्हणून मजुरीवर काम करतात, तर आई अनिता या दुसऱ्याच्या शेतात खुरपणी करतात. गणेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरी व्यायामासाठी त्याला सवड देणे आणि त्याच्या खुराकावर पैसा खर्च करण्याइतकी श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंत अफाट. त्यांनी गणेशला त्याची व्यायामाची आवड जोपासण्यासाठी आणखी कष्ट करायचे ठरविले. वयाच्या १२ व्या वर्षी तो हर्क्युलस जिममध्ये दाखल झाला. प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी त्याची आवड आणि चुणूक हेरली. त्यांनी त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तयार करण्याचे ठरविले. साधारण वर्षभरापूर्वी तो हवाईदलामध्ये भरती झाला आणि त्यांच्या पंखांना नवीन बळ मिळाले. गणेशनेही प्रशिक्षकांचा विश्वास न तोडता परिश्रम केले आणि त्याचे फळ त्याला कांस्यपदकाच्या रूपाने मिळाले. आज गणेशने राष्ट्रकुल स्पर्धा गाजविली. आता तो आशियाई स्पर्धेत खेळेल; पण त्याचे अंतिम लक्ष्य अर्थातच आॅलिम्पिक असणार आहे. २0२0च्या टोकिओ आॅलिम्पिकसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्याचे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले. आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याच्या हातून देशाचे नाव मोठे व्हावे, ही त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी आणखी कितीही कष्ट करावयास ते तयार आहेत.प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील मुलगासुद्धा क्रीडाक्षेत्रात थक्क करणारी कामगिरी करू शकतो, हे मला सिद्ध करावयाचे होते. गणेशच्या यशामुळे ते साध्य झाले आहे. भविष्यात तो यापेक्षा चांगली कामगिरी करू शकेल. त्याच्या वयाचा व अनुभवाचा विचार करता मी खूप आनंदी आहे.- प्रदीप पाटील, कोच