शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘परवाना रद्द’चा फायदा मोठ्या शहरांनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 01:00 IST

‘इज आॅफ डुर्इंग बिझनेस’ योजना : कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांना परवाने घ्यावेच लागणार

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूर राज्यातील हॉटेल व्यवसायासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या ‘इज आॅफ डुर्इंग बिझनेस’ या योजनेचा फायदा राज्यातील केवळ मोठ्या शहरांना होणार आहे. कारण या योजनेंतर्गत रद्द होणारे पाच परवाने पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे कोल्हापूरसारख्या परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शहरांना हॉटेल व्यवसायासाठी परवाने घ्यावेच लागणार आहेत. राज्यात उद्योग-व्यवसाय वाढीसाठी शासनाने ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ या योजनेंतर्गत विविध जाचक परवानग्यांची संख्या कमी केली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना ‘खाद्य नोंदणी प्रमाणपत्र’, ‘स्वीमिंग पूल परवाना’, सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणासाठी ‘पीपीईएल ए व बी’ आणि सादरीकरण अशा गृह विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही. केवळ पोलीस आयुक्तालये क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिकांनाच या योजनेचा फायदा होणार असून, परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शहरात मात्र परवानग्याचे भूत त्यांच्या मानगुटीवर असणारच आहे. राज्यात सध्या नऊ पोलीस आयुक्तालये व आठ परिक्षेत्र आहेत. मुंबई-पुण्यानंतर कोल्हापुरात आता पंचतारांकित, थ्री-स्टारची संख्या वाढत चालली आहे. शहरात सुमारे दीडशेच्यावर छोटी-मोठी हॉटेल्स आहेत; पण व्यावसायिकांना महापालिका, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क अशा विविध विभागांकडून ३७ परवाने घ्यावे लागतात. दरवर्षी या परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला येतात. या परवान्यातून सूट मिळावी, ही हॉटेल चालकांची मागणी आहे. मात्र, नव्या योजनेचा त्यांना थोडाही आधार नाही. या शहरांना होणार फायदा राज्यात मुंबई, पुणे, अमरावती, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे व सोलापूर या नऊ ठिकाणी पोलीस आयुक्तालये आहेत. येथील हॉटेलचालकांना ‘इज आॅफ डुर्इंंग बिझनेस’ या योजनेचा फायदा होणार आहे. ‘एक खिडकी’ अंतर्गत परवाने द्या... हॉटेल व्यवसायाशी संबंधित जे सर्व परवाने आहेत, ते ‘एक खिडकी’ अंतर्गत द्यावेत, अशी मागणी कोल्हापुरातील हॉटेल मालक-चालकांनी यापूर्वीच्या तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारकडे केली होती. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ‘एक खिडकी’ अंतर्गत सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी मागणी येथील हॉटेल व्यावसायिकांची आहे.