कसबा बीड येथे आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून १३ लाख ७५ हजार निधीच्या कामांचा प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क, सावरवाडी : करवीर विधानसभा मतदारसंघात जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकसंधपणा दर्शविला पाहिजे. जिल्ह्याचे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली करवीर विधानसभा मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करू, त्यासाठी संघटित ताकद हवी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील यांनी केले.
कसबा बीड (ता. करवीर) येथे आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून १३ लाख ७५ हजार रुपये मंजुरी प्राप्तअंतर्गत रस्ते कामाच्या प्रारंभ कार्यक्रमात राहुल पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सत्यजित पाटील होते .
यावेळी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासकीय फंड प्रत्येक गावात पी. एन. पाटील यांनी मंजूर केल्याने नवे विकास पर्व उभारले जात आहे. सरपंच व गोकुळ दूध संघाचे संचालक सत्यजित पाटील म्हणाले, गावच्या विकासासाठी पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होईल. यावेळी कार्यक्रमास आत्माराम पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील, भगवान सूर्यवंशी, मुकुंद पाटील, दिनकर सूर्यवंशी, सर्जेराव तिबिले, दिनकर गावडे, श्रीनिवास पाटील, संदीप सुतार, ग्रामसेवक संदीप पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो ०२ कसबा बीड राहुल पाटील
ओळ = कसबा बीड (ता. करवीर) येथे आ. पी. एन. पाटील यांच्या फंडातून १३ लाख ७५ हजार रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांच्या प्रारंभ कार्यक्रमप्रसंगी जि. प. सदस्य राहुल पाटील, सरपंच सत्यजित पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, रवींद्र पाटील, भगवान सूर्यवंशी, दिनकर सूर्यवंशी, आत्माराम पाटील, मुकुंद पाटील, ग्रामसेवक संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.