शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

चंदगडची ‘दौलत’ पुन्हा भाड्याने देणार

By admin | Updated: April 5, 2015 00:59 IST

जिल्हा बँकेची निविदा : देणी देण्याची अट, सक्षम कंपनीची प्रतीक्षा

कोल्हापूर : एकेकाळी चंदगड तालुक्यातील गोरगरीब सामान्य कष्टकरी जनतेची ‘दौलत’ असलेला दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी कार्यवाही जिल्हा बॅँकेने (केडीसीसी)ने शनिवारी सुरू केली. बँकेने त्यासाठी निविदा प्रसिद्ध करून प्रस्ताव मागवले आहेत. त्यामध्ये बँकेची देणी देण्याची महत्वाची अट आहे. यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर घेऊ इच्छिणाऱ्यांना पहिल्यांदा बँकेची देणी भागवून धुराडे पेटवावे लागणार आहे. ‘दौलत’ गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांची देणी देय आहेत. जिल्हा बँकेचे फेब्रुवारी २०१५ अखेर ६० कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज कारखान्याकडून थकीत आहे. त्यामुळे बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करून कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना ताब्यात घेतला. मात्र, प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण झाली होती, तीव्र विरोध झाला होता. बँकेने सभासद, ऊस उत्पादक यांच्या हिताचा विचार करून कारखाना ‘तासगावकर शुगर्स’ला चालविण्यास देण्यास ‘ना हरकत दाखला’ दिला. मात्र, व्यवस्थापन आणि तासगावकर यांच्यात वाद निर्माण झाला. व्यवस्थापनाने बँकेचा ‘ना हरकत दाखला’ न घेता परस्पर थिटे पेपर्स कंपनीला चालविण्यास दिला. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट करार केला. व्यवस्थापन आणि कंपनीने बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेल्या महिन्यात थिटे पेपर्स कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे बँकेला येणी वसूल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. कारखाना सक्षम कंपनीला चालविण्यास देण्यातील अडचणही दूर झाली आहे. २ एप्रिलला दौलत बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक, कामगारांच्या बैठकीत ‘दौलत’ चालविण्यास देण्यावर एकमत झाले आहे. शनिवारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना निवेदन दिले. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, अशी मागणी केली. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर होसूरकर यांनीही चव्हाण यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली आहे. कारखाना चालविण्यास देण्याच्या प्र्रक्रियेला गती आली आहे.