शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चला, गरजू-गरीबांची दिवाळी आनंदी करुया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 17:42 IST

कोल्हापूर : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’असे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातून कोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी अनेक गरीबांची दिवाळी आनंदी केली. कोल्हापूरकरांचे दातृत्वाची ओळख देशभरात पोहाचविणारा हा उपक्रम यावर्षी शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दसरा चौकात राबविण्यात येणार आहे.माणुसकीची भिंत हा उपक्रम गेल्या ...

ठळक मुद्दे‘माणुसकीची भिंत’ शनिवारपासून उभारणार‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ दसरा चौकात शनिवारी आणि रविवारी उपक्रम

कोल्हापूर : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’असे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातून कोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी अनेक गरीबांची दिवाळी आनंदी केली. कोल्हापूरकरांचे दातृत्वाची ओळख देशभरात पोहाचविणारा हा उपक्रम यावर्षी शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दसरा चौकात राबविण्यात येणार आहे.

माणुसकीची भिंत हा उपक्रम गेल्या दिवाळीपासून कोल्हापुरातील सीपीआर चौकात सुरू झाली. या उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. त्यामुळे वापरता येतील असे दोन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहाचवता आले. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. यावर्षी शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेत दसरा चौकात पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहणार आहे. याठिकाणी कोल्हापूरकरांनी वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देवून गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या संयोजकांनी केले आहे. दानशूर कोल्हापूरकरांनी ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमासाठी इतरांना वापरता येतील असे कपडे दान करावेत. कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील. या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या उपक्रमाच्या संयोजनासाठी सुधर्म वाझे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, गणी आजरेकर, सचिन पाटील, निनाद कामत, देवेंद्र रासकर, प्रशांत पोकळे, इम्तियाज मोमीन आदी परिश्रम घेत आहेत......................................................................................व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून साकारला उपक्रम‘लोकमत फॅन क्लब’ या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाची सुरुवात झाली. त्याला आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिले. गेल्या वर्षी तीन दिवसाच्या उपक्रमात २५६९ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरातील जुनी मात्र, वापरण्यायोग्य १ लाख ७९ हजार ८३० कपडे या उपक्रमासाठी जमा केले. यातून दीड लाखाहून अधिक गरजू, गरीबांनी येथून कपडे घेवून दिवाळी आनंदाने साजरी केली. गुढी पाडव्या निमित्त दुसºया सुरू केलेल्या या उपक्रमातही लाखाहून अधिक जणांनी याचा लाभ घेतल्याचे संयोजकांनी सांगितले