शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टरवरील बंदीबाबत राज्यस्तरीय बैठक घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गणेशोत्सवासोबत शिवसेना तसेच सवर्सामान्यांच्या भावना जोडल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गणेशोत्सवासोबत शिवसेना तसेच सवर्सामान्यांच्या भावना जोडल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत आपण लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कुंभार समाजाच्या शिष्टमंडळास दिली.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटवण्यासाठी बुधवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार बांधवांनी मंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी कुंभार समाजावर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, दोन वर्षांत महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. गणेशोत्सव ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असला तरी त्याची पूर्वतयारी वर्षाच्या सुरुवातीला करावी लागते. गणेशमूर्ती बनविण्यासाठी माती उपलब्ध होत नसल्याने मूर्ती सुबक आणि दर्जेदार बनण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस हेच एक माध्यम आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये केमिकल्स नाहीत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही, असे पुरावे आहेत. हरित लवादानेही सन २०१३ मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्यास मान्यता दिली आहे. तरी प्लास्टर वापरावरून कुंभार समाजावर कारवाई करू नये, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवावी.

यावेळी माजी महापौर मारुतीराव कातवरे, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, सतीश बाचणीकर, रवी माजगावकर, सुनील माजगावकर, शिवाजीराव वडणगेकर, पुणे कुंभार समाजाचे प्रवीण बावदणकर, पेण कुंभार समाजाचे अभय म्हात्रे, कैलास पाटील, हेमंत कुलकर्णी उपस्थित होते.

--

फोटो नं ०३०३२०२१-कोल-कुंभार बैठक

ओळ : प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवावी याबाबत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.