शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करूया

By admin | Updated: December 27, 2015 01:27 IST

विनय कोरे यांनी डागली तोफ : मालोजीराजेंच्या उपस्थितीने धक्का

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटाच असा आहे की, सातत्याने आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात लढत आलो आहे. या निवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून या प्रवृत्तीला जिल्ह्यातून हद्दपार करूया, अशी तोफ जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत डागली. या बैठकीस उपस्थित राहून माजी आमदार मालोजीराजे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. माझे चार मतदार सतेज पाटील यांनाच मतदान करतील, असे त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले. पुण्यातील आलिशान हॉटेलमध्ये मतदारांसमवेत ही बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या मतदारांना चांगलीच तंबी दिली. कोरे म्हणाले, ‘आता या व्यासपीठावर असलेल्या सर्व नेत्यांनी महाडिक यांच्यासंबंधीची भूमिका वेळोवेळी बदलली आहे; परंतु आमचे महाडिक यांच्याशी कधीच जमले नाही. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तरी मी महाडिक यांना मदत करण्यास नकार दिला; महाडिक यांचे दलबदलू राजकारण मला कधीच मान्य नाही. ही माझी भूमिका यापूर्वीही होती व तीच यापुढेही राहील. काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्या महाडिक यांच्याबाबतची भूमिका पी. एन. पाटील यांनी जाहीर करावी.’ हसन मुश्रीफ म्हणाले, ‘दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमुळे आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची सर्वांवर जबाबदारी आहे. त्यात कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही.’ पी. एन. पाटील यांनी सर्व सदस्यांनी सतेज पाटील यांना मतदान करून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याच्या सूचना दिल्या. या निवडणुकीत जे नेते या व्यासपीठावर एकत्र आले आहेत, त्यांनी भविष्यातील राजकारणातही असेच एकत्र राहावे, अशी अपेक्षा ‘पी. एन.’ यांनी व्यक्त केली. जयंत पाटील पोलिंग एजंट गेल्या निवडणुकीतील आमदार महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढविलेले जनसुराज्य पक्षाचे प्रा. जयंत पाटील हे या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचे पोलिंग एजंट आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तरी मी महाडिक यांना मदत करण्यास नकार दिल्याचे कोरे यांनी सांगितले. महाडिक यांचे दलबदलू राजकारण मला कधीच मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘राष्ट्रवादी’चा व्हिप प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका व महापालिकेचे नगरसेवक यांनी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांना मतदान करावे. मतदान प्रक्रियेत पक्षविरोधी काम केल्यास कारवाई करण्यात येईल, असा व्हिप जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी शनिवारी सायंकाळी मतदारांना बजावला. हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने व्हिप बजावूनही त्याचा उपयोग होणार नसल्याने कॉँग्रेसने मात्र व्हिप लागू न केल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)