शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीवाढीसाठी वाढत्या महागाईचा विचार व्हावा

By admin | Updated: March 30, 2016 00:43 IST

खर्चीवाले यंत्रमागधारकांची मागणी : प्रांताधिकारी कार्यालयात यंत्रमागधारक संघटनेची बैठक

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वाढीबरोबरच खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ करण्यात यावी. खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ करताना कामगारांची मजुरीवाढ आणि वीज दरवाढीबरोबरच वाढत्या महागाईचाही विचार करण्यात यावा. तसेच व्यावसायिक मंदीच्या वेळी कापड व्यापाऱ्यांकडून कमी करण्यात येणारी खर्चीवाले यंत्रमागधारकांची मजुरी पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी, अशी मागणी येथील प्रांताधिकारी कार्यालयातील यंत्रमागधारक संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये जानेवारी २०१३ पासून मजुरीवाढ करण्यात यावी, अशी मागणी शहरातील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. खर्चीवाले यंत्रमागधारकांना ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर दोन रुपये ८६ पैसे मजुरी मिळत असून, सध्याच्या महागाईचा विचार करता ती चार रुपये ६८ पैसे मिळावी, अशी मागणी यंत्रमागधारक संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांमध्ये यंत्रमागधारक संघटना व कापड व्यापारी संघटना यांच्या प्रतिनिधींच्या चार बैठका झाल्या. मात्र, या चारही बैठकांमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही.अशा पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी शहरातील पाचही यंत्रमागधारक संघटनांची बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनबरोबर यंत्रमागधारक जागृती संघटना, जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन व पॉपलीन क्लॉथ पॉवरलूम असोसिएशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विनय महाजन, सतीश कोष्टी, नारायण दुरूगडे, सचिन हुक्किरे, दीपक राशीनकर, विश्वनाथ मेटे, आदींनी आपले विचार मांडले.बहुतांशी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी दरवर्षी जानेवारी महिन्यात यंत्रमाग कामगारांना होणाऱ्या मजुरीवाढीच्या प्रमाणात तीनपट ते चारपट प्रमाणात खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळावी, अशी मागणी केली. गेल्या तीन वर्षांमध्ये यंत्रमाग कामगारांना १८ पैसे मजुरीवाढ देण्यात आली असून, खर्चीवाले यंत्रमागधारकांना ५४ ते ७२ पैसे मजुरीवाढ मिळावी, असाही आग्रह या बैठकीत धरण्यात आला.अखेर प्रांताधिकारी जिरंगे यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि ही बैठक संपुष्टात आली. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूकवस्त्रोद्योगात होणाऱ्या मंदीबरोबर यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जात नाही. मात्र, वस्त्रोद्योगात आर्थिक मंदी आली असता मंदीच्या गोंडस नावाखाली कापड व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केली जाते, ज्यामुळे खर्चीवाले यंत्रमागधारकांची आर्थिक पिळवणूक होते. याच काळात कामगारांचा पगार, वाढलेले वीज दर आणि वाढलेली महागाई याचा कोणताही विचार कापड व्यापारी करीत नाही. त्याचा परिणाम म्हणून खर्चीवाले यंत्रमागधारकांना नुकसान सोसावे लागते. म्हणून आर्थिक मंदीच्या काळात खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये कसलीही कपात करू नये, अशी जोरदार मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेने या बैठकीत केली.