शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सर्व जिल्ह्यांतील विकासकामे बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 00:49 IST

शासकीय ठेकेदारांचा इशारा : राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची घोषणा

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेऊन शासनाने रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये बड्या कंपन्यांसाठी लाल गालिचा अंथरण्याचा घाट घातला आहे. यामुळे राज्यातील पाच लाखांहून अधिक ठेकेदार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय न रद्द झाल्यास लवकरच सर्व जिल्ह्णांतील विकासकामे बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष एन. डी. लाड व महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राज्यातील २० जिल्ह्णांतील ठेकेदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या निर्णयांची व चर्चेची माहिती बैठकीनंतर कोल्हापूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.लाड म्हणाले, बैठकीत राज्यातील छोट्या-मोठ्या ठेकेदारांचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर १२ एप्रिल २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांचा परवाना रद्द करण्याचा घेतलेला शासन निर्णय रद्द करावा, या शासन निर्णयाची सर्व जिल्ह्णांत होळी करावी. सर्व जिल्ह्णांतील विकासकामे बंद करावीत. राज्य व राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे तीव्र आंदोलन हाती घ्यावे, असे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देण्याचेही या बैठकीत ठरले. त्यानुसार मंत्री पाटील यांना लवकरच हे निवेदन देण्यात येणार आहे.मिलिंद भोसले म्हणाले, पारदर्शकतेसाठी ठेकेदारांवर गंडांतर आणणाऱ्या राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम मंत्रीही अभियंताच करावा; कारण त्याशिवाय पारदर्शक कारभार होणार नाही.दरम्यान, झालेल्या बैठकीत सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेदगे म्हणाले, शासनाच्या या निर्णयामुळे लहान व मध्यम ठेकेदार उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन याबाबत एल्गार पुकारावा.अर्थ मूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष आर. आर. पाटील म्हणाले, ठेकेदारांनी यंत्रसामग्रीसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने संघर्षाची तयारी ठेवावी. नंदूरबारचे शंकरराव मोरे, जिल्हा परिषद कॉँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष एम. जी. पाटील, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष एन. डी. लाड, खजानिस सुनील नागराळे, सुरेश घुले, आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शिवाजी काशीद, संजय पाटील, कांतिलाल डुबल, नरेंद्र भोसले, कैलास लांडे, आदी उपस्थित होते.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी राज्यभरातील शासकीय ठेकेदारांच्या बैठकीत सुनील नागराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप मेदगे, मिलिंद भोसले, एन. डी. लाड, सुनील जाधव, बी. एस. पाटील, आदी उपस्थित होते.