शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया

By admin | Updated: May 12, 2017 01:12 IST

मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजनशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करत तो जगभरात पोहोचविण्याचा निर्धार गुरुवारी अखिल भारतीय मराठा संघाच्यावतीने आयोजित बैठकीत केला. यानिमित्ताने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन व्याख्यान, प्रबोधनपर, पर्यावरणपूरक कार्यक्रम, शिवरायांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, शिस्तबद्ध मिरवणूक अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबन लांडगे, डॉ. संदीप पाटील, सीमा पाटील, अरुण कांबळे, विजय तडेकर, नगरसेविका रूपाराणी निकम, संभाजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवशक, भाषा शुद्धिकरण, शिवमुद्रा असे निर्णय घेत खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने ‘शिवाजी’ नावाचा महिमा जगभर पोहोचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, युवकांचा सहभाग असे उपक्रम हाती घेऊया. शिवराज्याभिषेक दिनाची ६ जूनला निघणारी मिरवणूक ही डॉल्बीमुक्त व विधायकतेचा संदेश देणारी असेल.इंद्रजित सावंत म्हणाले, परकीयांच्या जोखडात अडकलेल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य सोहळा म्हणून शिवराज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस जगभरात पोहोचवून त्याचा लोकोत्सव करण्यासाठी कोल्हापूरकरांचा सहभाग महत्त्वाचा आहे. रूपाराणी निकम म्हणाल्या, शिवाजी महाराजांचे कार्य डोक्यावर घेऊन नव्हे तर डोक्यात घेऊन मराठा महासंघाचे कार्य सुरू आहे. यावेळी बबन लांडगे, शिरीष देशपांडे, डॉ. संदीप पाटील यांचीही भाषणे झाली. मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष फारूख कुरेशी यांनी या सोहळ््यात मुस्लिम समाजाचा सहभाग असेल, असे सांगितले. सोमनाथ घोडेराव, मोहन जाधव, रमेश आपटे, विजय तडेकर, विजयसिंह पाटील, अरुण कांबळे, सीमा पाटील, शैलजा भोसले, सतीश कोळसे-पाटील, आनंद म्हाळुंगेकर, यांनी मनोगत व्यक्त केले. सुवर्णसिंहासनासाठी योगदान इंद्रजित सावंत म्हणाले, राज्य शासनाने गेल्यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडाच्या संवर्धनासाठी पाचशे कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, त्यातला एक रुपयाचा निधीही दिलेला नाही. पूर्वी येथे शिवाजी महाराजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन होते, असे सिंहासन पुन्हा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील एका संघटनेचे पुढाकार घेतला आहे. यानिमित्ताने रायगडचे जतन संवर्धन होणार असेल तर सुवर्ण सिंहासनासाठी कोल्हापूरकरांनी योगदान द्यावे.