शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सर्कि ट बेंचचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करू ;

By admin | Updated: March 27, 2015 00:29 IST

मुख्यमंत्री फडणवीस: खंडपीठ कृती समितीशी चर्चा

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्कि ट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल, तसेच विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला गुरुवारी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले होते. सर्किट बेंचच्या मागणीसाठी राज्य मंत्रिमंडळ ठराव करेपर्यंत पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून धरणे धरण्याचा, मुंबई येथे लाँग मार्चने जाऊन लाक्षणिक उपोषण करण्याचा तसेच महालोकन्यायालयाचे कामकाज बंद पाडण्याचा निर्णय कऱ्हाड येथील खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृती समितीला मुंबईत बैठकीचे निमंत्रण दिले. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी आपण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा व राज्यपालांना पत्र दिल्याचे सांगितले होते; परंतु हे पत्र अद्याप कोणालाच पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले आहे. फक्त पत्राने ही मागणी पूर्ण होणार नाही, त्यासाठी ‘कोल्हापूर’चा उल्लेख करून मंत्रिमंडळाचा ठराव झाल्याखेरीज ही मागणी पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल. तसेच याप्रश्नी मंत्रिमंडळासमोर विषय ठेवण्यास मंजुरी दिली असून, अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही देत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्याशी या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता अधिवेशनानंतर दोन आठवड्यांत करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, मुख्य न्यायाधीश शहा यांचा कार्यकाल संपत आल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी शासनाने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याने त्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले. शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे, राजेंद्र मंडलिक, के. व्ही. पाटील, प्रशांत चिटणीस, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, संपतराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, किरण कुलकर्णी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)