शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीतील उपोषणाकडे लोकप्रतिनिधींची पाठ

By admin | Updated: March 1, 2016 00:17 IST

हद्दवाढ विरोधी आंदोलन : अकरा दिवस होऊनही साधी चौकशी नाही

सतीश पाटील -- शिरोली शिरोली गावाने कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढ विरोधात पुकारलेल्या आंदोलनाकडे प्रशासकीय अधिकारी, खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. निवडणूक जवळ आल्यावर कसल्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी गरजेच्यावेळी पाठ फिरवल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. दरम्यान, तब्बल अकराव्या दिवशी सोमवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा नवीन प्रस्ताव जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावातून दोन्ही एमआयडीसी वगळून इतर शिरोलीसह सतरा गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे हद्दवाढ विरोधात शिरोलीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, आरपीआय या सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले आहे. चार दिवस गाव बंद ठेवले होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. मंगळवार (२३ फेब्रुवारी)पासून ग्रामपंचायत चौकात सर्वपक्षीय बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडून जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या या आंदोलनकर्त्यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेटसुद्धा घेतलेली नाही. साधी चौकशीसुद्धा केलेली नाही. तर काँग्रेसच्या काळात हद्दवाढ थांबविली, अशी बढाई मारणारे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनीही आंदोलनाची दखल घेतली नाही. इतरवेळी शिरोलीत खासगी कार्यक्रमासाठी यायला या लोकप्रतिनिधींकडे वेळ असतो, पण गेले दहा दिवस सुरू असलेल्या आंदोलनाकडे त्यांंनी कशासाठी लक्ष दिले नाही हा प्रश्न शिरोलीकरांना पडला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी तेवढी सोमवारी (दि. २९) उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे.शिरोलीतूनच जाणाऱ्या तहसीलदारांचेही दुर्लक्षहातकणंगले तालुक्याचे तहसीलदार दीपक शिंदे हे जवळपास दररोजच शिरोलीमधून येत-जात असतात, पण त्यांना या आंदोलनाला भेट द्यावी असे वाटले नाही. महामार्ग रोखला त्यादिवशी आंदोलन शांततेत पार पडल्यावर महामार्गावर एसी गाडीतून आले आणि खाली न उतरताच परत गेले, तर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी या आंदोलनाची चौकशीसुद्धा केली नाही.