शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजप बैठकीकडे खासदार गटाची पाठ

By admin | Updated: June 25, 2016 00:50 IST

‘वालचंद’च्या वादाची पार्श्वभूमी : आगामी निवडणुकांची तयारी करण्याची कार्यकर्त्यांना सूचना

सांगली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सांगलीत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीकडे खासदार संजयकाका पाटील गटाने पाठ फिरवली. त्यामागे वालचंद महाविद्यालयात झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा बैठकीस्थळी सुरू होती. निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ बैठकीत केले .येथील टिळक स्मारक मंदिरात शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रमेश शेंडगे, मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा भारती दिगडे आदी उपस्थित होते. या बैठकीला खासदार संजयकाका पाटील अनुपस्थित होते. ते कवठेमहांकाळ येथील नियोजित कार्यक्रमात असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी वालचंद महाविद्यालयाच्या ताब्यावरून खासदार पाटील व पृथ्वीराज देशमुख यांच्यात वाद रंगला होता. देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर खासदार पाटील व त्यांच्या समर्थक सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा घेत देशमुखविरोधी गटाला साथ दिली होती. यावरून पाटील व देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते, पण खासदार पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. यावेळी देशमुख म्हणाले की, जत तालुक्यातील गुड्डापूर येथे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा विशेष प्रशिक्षणवर्ग होणार आहे. खासदार,आमदार, प्रमुख पदाधिकारी यांना प्रशिक्षण बंधनकारक आहे. या शिबिरात जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीची तयारी करून घेतली जाणार आहे . पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत २८ जून रोजी या निवडणुकीसंदर्भात बैठक होईल. आमदार गाडगीळ म्हणाले की, येत्या आठ दिवसात मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी, प्रत्येक भागात कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार करा. राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या दीड वर्षात २६ कोटींची विकासकामे केली. आम्ही दोघा आमदारांनी ५६ कोटींची कामे केली. आता निवडणुका तोंडावर आहेत. पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावे. आमदार खाडे म्हणाले की, जिल्ह्यात ६६ टक्के भाजपची, तर ४४ टक्केकाँग्रेसची सत्ता आहे. आगामी निवडणुका ताकदीने लढवू. यावेळी मुन्ना कुरणे, मकरंद देशपांडे यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रकाश ढंग यांनी प्रदेश कार्यकारिणीत झालेल्या ठरावाचे वाचन केले. (प्रतिनिधी)