शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

दिल्ली काबीज करणारा चित्ता काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

लाल मातीतला हिरा लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला ...

लाल मातीतला हिरा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले.

सारे जीवन लाल मातीतील कुस्तीला वाहून घेतलेला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिलेला नामांकित मल्ल अशी खंचनाळे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुस्तीतला जिगरबाज हिरा कायमचा लुप्त झाला. नवी दिल्लीत ३ मे १९५९ ला झालेल्या लढतीत बत्तासिंगला चितपट करून ते हिंदकेसरी झाले होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे ही लढत पाहण्यास आवर्जून उपस्थित होते.

उमेदीतील प्रचंड व्यायामामुळे सारे शरीर खिळखिळे झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होता. त्यातच वृद्धापकाळाने आलेल्या व्याधीमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक शासनाच्या ‘कर्नाटक भूषण’ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. पांढरी विजार, डोक्यावर पांढरी टोपी व अंगात पांढरा सदरा असे त्यांचे अत्यंत साधे राहणीमान होते.

खंचनाळे मूळचे कर्नाटकातील एकसंबा (ता. चिक्कोडी, बेळगाव)चे. त्यांचे वडीलही पैलवान होते. त्यांनी या मुलातील कुस्तीची ओढ ओळखून त्यांना कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत पाठविले व कोल्हापूर हीच खंचनाळे यांची कर्मभूमी ठरली. पंचक्रोशीतील कुस्त्या जिंकून त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. शाहूपुरी तालमीत आल्यावर वस्ताद हसनबापू तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. कुस्तीतील भीष्माचार्य विष्णू नागराळे, मल्लाप्पा थडके यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला. अत्यंत धिप्पाड शरीर, वजन १२८ किलो, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि प्रतिस्पर्धी मल्लाच्या उरात धडकी भरेल असा करारी बाणा त्यांना लाभला होता. त्या बळावरच त्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नावाजलेल्या मल्लांना अस्मान दाखविले. अत्यंत चपळाईने कुस्ती करणारा मल्ल अशीही त्यांची ओळख होती. ज्या काळात कुस्तीला अलोट प्रेम मिळाले, परंतु फारसे आर्थिक पाठबळ मिळत नव्हते, तेव्हा या मल्लाने कुस्ती गाजवली. शासनाकडून पुरस्कार मिळाले, गौरव झाला; परंतु फारशी आर्थिक मदत त्यांना मिळाली नाही. तरीही त्यांनी लाल मातीशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतरही नवे मल्ल घडविण्याचे काम त्यांनी केले. अलीकडील किमान वीस वर्षांत त्यांचा तालमीशी संपर्क कमी झाला असला, तरी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून ते कुस्ती कलेच्या संवर्धनासाठी सक्रिय होते. या संघाचे ते पाच वर्षे अध्यक्षही होते.

आधी हिंदकेसरी... नंतर महाराष्ट्र केसरी

खंचनाळे आधी हिंदकेसरी झाले व त्यानंतर त्याच वर्षी कऱ्हाडला झालेल्या लढतीत अनंत शिरगांवकर यांना हरवून ते ‘महाराष्ट्र केसरी’ झाले. त्यांच्या कुस्तीचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच चितपट झाले नाहीत. करिअरच्या एका टप्प्यावर ते कुस्तीतून आब राखून निवृत्त झाले. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी शेतीत लक्ष घातले; परंतु कुस्तीला बट्टा लागेल असा व्यवहार त्यांच्याकडून कधीच झाला नाही. ‘खंचनाळे पैलवान’ अशीच त्यांची ओळख कायम राहिली. त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, समोर कोणीही आला तरी खंचनाळे यांना नमस्कार केल्याशिवाय तो पुढे जात नसे.

चौकट

सजविलेल्या ट्राॅलीतून अंत्ययात्रा

हिंदकेसरी खंचनाळे यांची दुपारी बारा वाजता त्यांच्या रुईकर काॅलनीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. रुईकर काॅलनी, ताराराणी चौक, स्टेशन रोड, दसरा चौक, वीरशैव लिंगायत रुद्रभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळ गायकवाड, संघाचे सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी विनोद चौगुले, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उपमहाराष्ट्र केसरी अमृता भोसले, माजी महापौर शिवाजीराव कदम, मारुतराव कातवरे, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी नगरसेविका उमा इंगळे, वस्ताद मुकुंद करजगार, महावीर गाठ, कुस्ती अभ्यासक अमितकुमार गाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे, हिंद को-ऑप. हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत घोडके, आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

फोटो : ११४१२२०२०-कोल-श्रीपती खंचनाळे ०१

ओळी : देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. रुईकर काॅलनीतील त्यांच्या निवासस्थानापासून सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्राॅलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

(सिंगल फोटो यापूर्वी पाठविले आहेत)