शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बहर लांबल्याने लिंबू महाग

By admin | Updated: October 23, 2014 22:53 IST

वातावरणात बदल : उत्पादन घटल्याने नगास चार ते पाच रुपये दर

सांगली : गेल्यावर्षीचा तीव्र उन्हाळा आणि यंदा झालेला जोरदार पाऊस या वातावरणातील फरकाचा परिणाम लिंबू पिकावर झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. परिणामी दर गगनाला भिडले आहेत. चांगल्या दर्जाचा लिंबू प्रतिनग चार ते पाच रुपये झाला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेला लिंबू हिरवा असून त्यात रसाचे प्रमाण अत्यल्प आहे. सांगली, मिरज मार्केटमध्ये सोलापूर, पुणे जिल्ह्यातील दौंड, श्रीगोंदा आणि कर्नाटकमधून लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु, त्या भागात गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे लिंबूच्या बागा वाळून गेल्या. काही शेतकऱ्यांनी बागा वाळू दिल्या नाहीत; पण पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये मोहोर कमी प्रमाणात आला. त्यानंतर मृग नक्षत्रातही कमी बहर आला. आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस अजूनही जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात सुरूच आहे. जादा पावसामुळे लिंबूच्या झाडांवर तांबेरा, ठिपक्या रोग पडल्याच्या तक्रारी आहेत. जादा पावसामुळे झाडाच्या मुळ्या दबल्यामुळे फळांमध्ये पुरेसा रस तयार होत नाही. लिंबूची टंचाई असल्यामुळे शेतकरी केवळ हिरवट लिंबूचीच बाजारात विक्री करू लागले आहेत. हिरव्या लिंबूचे दरही गगनाला भिडले आहेत. सांगलीच्या बाजारात तर लिंबूची विक्री प्रतिनग चार ते पाच रुपयाने होत आहे. बाजारामध्ये सध्या चांगले पिकलेले दोन लिंबू दहा रुपयांना मिळत आहेत. याचा फटका नागरिकांंसह हॉटेल व्यावसायिक आणि लिंबू-सरबताची विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांनाही बसला आहे. (प्रतिनिधी) विविध रोगांचा प्रादुर्भावआॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात सुरू आहे. याचा परिणाम लिंबूच्या बागांवर झाला आहे. झाडांवर तांबेरा, ठिपक्या या रोगांनी आक्रमण केले आहे. तसेच पावसाने फळांमध्ये रस तयार झालेला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पूर्वी हॉटेलमध्ये कांदा, टोमॅटोचे दर वाढल्यानंतर भाजीतून ते गायब होत असे. छोटे हॉटेल व्यावसायिक तर कांदाभजी करणेच टाळत. गेल्या दहा वर्षांत हॉटेल व्यावसायिकांना कधीच लिंबूची टंचाई जाणवली नाही. मात्र सध्या एक लिंबू चार ते पाच रुपयाला मिळत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे, अशी प्रतिक्रिया सांगलीतील हॉटेल व्यावसायिक दौलतराव घोरपडे यांनी दिली.वातावरणातील बदलामुळे लिंबूचे उत्पादन घटले असून, रोगही पडला आहे. शेतकऱ्यांनी पाणी कमी प्रमाणात देऊन मायक्रोन्युट्रेड खताचा वापर करण्याची गरज आहे.- आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.उन्हाळ्यामुळे लिंबूच्या अनेक बागांना पुरेसे पाणी मिळाले नाही. यामुळे मोहर, मृगाच्या काळात लिंबूच्या झाडांना कळीच आली नाही. सध्या कळी आली आहे, पण जादा पावसामुळे तांबेरा रोग पडला असून, फळावर ठिपके पडले आहेत.- भरत तळंगे, आरग (ता. मिरज)