शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘लेकी’ची मेहनत अन् ‘आई’चा विजय!

By admin | Updated: October 21, 2014 00:39 IST

चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व : बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ

राम मगदूम - गडहिंग्लज -स्व. बाबासाहेब कुपेकरांची पुण्याई, निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा व प्रामाणिक धडपड, लेक नंदातार्इंनी घेतलेली मेहनत आणि त्यांना जनतेने मनापासून दिलेल्या प्रतिसादामुळेच ‘आईसाहेब’ दुसऱ्यांदा आमदार झाल्या. स्वकीयांशी व विरोधकांशी संघर्ष करून संध्यादेवी कुपेकरांनी ‘चंदगड’मध्ये ‘राष्ट्रवादी’चे अस्तित्व सिद्ध केले. चित्री व फाटकवाडीसह लहान-मोठे धरण प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची सोय केली. वाड्या-वस्त्यादेखील डांबरी रस्त्यांनी जोडल्या. जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जिवा-भावाच्या कार्यकर्त्यांची फळी उभारून पक्षसंघटना बळकट केली. सहानुभूतीपोटी पोटनिवडणुकीत संध्यादेवींना साथ दिलेल्या जनतेने कर्तव्यापोटी सार्वत्रिक निवडणुकीतदेखील मनापासून साथ दिली. ‘चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास’ या एकाच ओळीच्या जाहीरनाम्यावर बाबांनी गतवेळची निवडणूक जिंकली होती. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी संध्यादेवी धडपडल्या. चंदगड मतदारसंघाच्या वडीलकीची जबाबदारी सक्षमपणे पेलतानाच बाबांचा गोतावळाही त्यांनी आईच्या ममतेने सांभाळला. बाबांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी संध्यादेवींनी भरून काढली. ‘एव्हीएच’ हटावासह ‘चंदगड’मधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नातही त्यांनी रणरागिनीची भूमिका घेतली. त्यामुळेच या मातेच्या विजयाची जबाबदारी गडहिंग्लज-आजरेकरांसह रांगड्या चंदगडकरांनीही आपल्या शिरावर घेतली अन् विजयश्री खेचून आणली. केवळ बाबांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानेच राजकारणाचा संबंध आलेल्या त्यांच्या कन्या डॉ. जयश्री, डॉ. सुनेत्रा व डॉ. नंदिनी या भगिनींनी पोटनिवडणुकीप्रमाणेच यावेळीही आईच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बंधू रामराजेंनी त्यांना साथ दिली. अगदी स्वत:चीच निवडणूक असल्याप्रमाणे कार्यकर्ते राबल्यामुळेच घरात आणि पक्षात बंडखोरी होऊनही संध्यादेवींनी बाजी मारली अन् ‘पाणीवाल्या’ बाबांची पुण्याई फळाला आली.एकच ताई ‘नंदाताई’ !नंदातार्इंनी निवडणूक लढविण्याची इच्छा कधीही व्यक्त केलेली नसतानादेखील ‘दादा’ की ‘ताई’ वादाची चर्चा झाली. उमेदवारीवरून गृहकलह नको म्हणून संध्यादेवींनी माघारीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी लढल्या अन् जिंकल्याही. या ऐतिहासिक व संस्मरणीय निवडणुकीच्या ‘सूत्रधार’ राहिल्या त्या ‘नंदाताई’च!उदयराव अन् जयसिंगराव!स्व. कुपेकरांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे राहिलेले उदयराव जोशी व जयसिंगराव चव्हाण या कार्यकर्त्यांवर अगदी व्यक्तिगत पातळीवरदेखील टीका झाली. धमक्याही मिळाल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी राष्ट्रवादीच्या विजयासाठी केलेली व्यूहरचना यशस्वी झाली.गाव सांगा..काम सांगते..!आम्ही बॅगा भरून निघालो होतो. मात्र, दादांच्या जिवा-भावाच्या कार्यकर्त्यांसाठी मागे फिरलो. त्यांच्या अश्रूंची थट्टा करू नका, असा सल्ला टीकाकारांना देत नंदातार्इंनीप्रचाराची सूत्रे एकहाती सांभाळली. गावाच नाव सांगा, कितीचे काम केले ते सांगते, अशा शब्दांत त्यांनी पुराव्यानिशी विकासकामांची यादीच गावोगावी सादर केली. बाबांच्या स्टाईलने नंदातार्इंनी केलेला प्रचार प्रभावी ठरला.गाव सांगा..काम सांगते..!आम्ही बॅगा भरून निघालो होतो. मात्र, दादांच्या जिवा-भावाच्या कार्यकर्त्यांसाठी मागे फिरलो. त्यांच्या अश्रूंची थट्टा करू नका, असा सल्ला टीकाकारांना देत नंदातार्इंनीप्रचाराची सूत्रे एकहाती सांभाळली. गावाच नाव सांगा, कितीचे काम केले ते सांगते, अशा शब्दांत त्यांनी पुराव्यानिशी विकासकामांची यादीच गावोगावी सादर केली. बाबांच्या स्टाईलने नंदातार्इंनी केलेला प्रचार प्रभावी ठरला.