शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

बाजार समितीमध्येही विधानसभेची पुनरावृत्ती

By admin | Updated: July 3, 2015 01:16 IST

शिवसेना-भाजपचा आशावाद : ‘शिव-शाहू’ आघाडीचा प्रचार प्रारंभ; दोन्ही काँग्रेससह जनसुराज्यवर सडकून टीका

कोल्हापूर : मतदारांना गृहीत धरणाऱ्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने जागा दाखविली. त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या निवडणुकीत होईल, असा विश्वास शिव-शाहू परिवर्तन आघाडीचे प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षांच्या भ्रष्टाचारी कारभारावर चांगलीच तोफ डागली.कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी हॉल येथे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिव-शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार प्रारंभाचे आयोजन केले होते. यावेळी मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. मंडलिक यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचारास प्रारंभ झाला.भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, आ. अमल महाडिक, आ. सुजित मिणचेकर, आ. उल्हास पाटील, आ. सत्यजित पाटील-सरुडकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे संचालक अमरीश घाटगे, मारुती जाधव-गुरुजी, विजय मोरे, बाबा देसाई, बाजीराव पाटील, बाबूराव देसाई, भूषण पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. संजय मंडलिक म्हणाले, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची भाकरी करपून काळी ठिक्कर पडली असून, ती परतावीच लागणार आहे. आ. सत्यजित पाटील-सरुडकर म्हणाले, समितीमधील भ्रष्टाचारात कॉँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच जनसुराज्य हाही या पापाचा भागीदार आहे. आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, सर्वसामान्यांचे पॅनेल एका बाजूला, तर चमचेगिरी करणाऱ्यांचे पॅनेल दुसऱ्या बाजूला, अशी स्थिती आहे. पीक कर्जातील पाच टक्के कपातीचा निर्णय चुकीचा आहे. आ. चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, सुजित मिणचेकर, अमरीश घाटगे, आ. उल्हास पाटील, महेश जाधव यांचीही भाषणे झाली. संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. सुनील मोदी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)अरुण नरके आमच्यासोबतअरुण नरके, सदाशिव चरापले, अमरसिंह पाटील यांच्यासह सुज्ञ मंडळींचा आमच्या पॅनेलला पाठिंबा असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.‘एवाय’ म्हणजे एरंडवाळवंटात फक्त एरंडच उगवतो; त्यामुळे पर्याय नसल्याने लोक त्याची महावृक्ष म्हणून पूजा करतात, तशीच राष्ट्रवादीची अवस्था आहे. जिल्हाध्यक्षपदाला माणूस मिळेना म्हणून ए. वाय. पाटील यांची निवड झाल्याची खिल्ली मारुती जाधव-गुरुजी यांनी उडविली.