शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेचे पडसाद उमटणार

By admin | Updated: June 6, 2016 00:47 IST

- जयसिंगपूर नगरपालिका रणांगण

संदीप बावचे-- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात जयसिंगपूर शहराचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे़ बदलत्या राजकीय परिस्थितीत जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे़ येथील नगरपालिकेची निवडणूक आतापर्यंत पक्षीय पातळीवर न होता गटातटाच्या राजकारणातच झाली आहे़ गटाअंतर्गत झालेल्या या निवडणुकीत यड्रावकर गटाने बाजी मारली आहे़ नगरपालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून यड्रावकर गटाची सत्ता अबाधित आहे़ होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीची छाप पडण्याची शक्यता राजकीय वातावरणात व्यक्त होत आहे़ नगरपालिका निवडणुकीत प्रत्यक्षात येथे कोणता पॅटर्न राबविला जाईल, याबाबत संभ्रमावस्था आहे़ गतवेळच्या सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत यड्रावकर व सा़ ऱे पाटील गटाच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी बाजी मारली़ खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीला खातेही उघडता आले नाही़ सत्तेची सूत्रे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाच्या हाती जाणार हे स्पष्ट होताच जनसुराज्य पक्षाच्या एका सदस्याने व अपक्षाने सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केली़ त्यामुळे पालिकेवर गेली पाच वर्षे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची एकहाती सत्ता राहिली़राज्यातील भाजप आघाडी सरकारने होऊ घातलेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे़ जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडते़ यावर येथील निवडणुकीची चुरस अवलंबून राहणार आहे़गेल्या पाच वर्षांत येथील नगरपालिकेवर यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची सत्ता राहिली़ मात्र, सा़ रे़ पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाची सूत्रे दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिलराव यादव यांच्या हाती राहिली आहे़ यड्रावकर गटाशी ते मिळते-जुळते घेणार की, आपला वेगळा सवतासुभा निर्माण करणार यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे़ त्याचबरोबर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीला हादरा देत पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील कोणती भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे़ खासदार राजू शेट्टी या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने मोट बांधतात, हेही महत्त्वाचे आहे़विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ़ राजेंद्र पाटील-यड्रावकर हे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहिले़ त्यामुळे यड्रावकर विरोधक विधान परिषदेतील पराभूत उमेदवार महादेवराव महाडिक यांना या निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ खा़ राजू शेट्टी, महादेवराव महाडिक, आमदार उल्हास पाटील अशी शक्ती एकवटल्यास ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे़