शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

उंबर्डेतील वायरमनचा राधानगरीत अपघाती मृत्यू

By admin | Updated: May 29, 2016 00:19 IST

दुचाकीला ट्रकची धडक : मित्राच्या साखरपुड्याहून येताना दुर्घटना

वैभववाडी : उंबर्डे मेहबूबनगर येथील सय्यद जाफर लांजेकर (वय २३) या युवकाचा तारळे (ता. राधानगरी) येथे ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. वाडीतील मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून येताना दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे उंबर्डे मेहबूबनगरवर शोककळा पसरली आहे. सय्यद हा वेंगसर येथे वायरमन होता. याबाबत अधिक माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील किरवे येथे मेहबूबनगर येथील मित्राच्या साखरपुड्यासाठी सय्यद सकाळी आपल्या दुचाकीने नातलगासमवेत गेला होता. तेथून दुपारी ते उंबर्डेला येण्यास निघाले होते. तारळेनजीक ट्रकची त्यांना धडक बसली. ट्रकच्या मागच्या टायरखाली सापडल्याने सय्यदचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर त्याच्या मागे बसलेला युवक सुदैवाने बचावला असून, त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर काहीच मिनिटांत साखरपुड्याला गेलेल्या मंडळींची वाहने घटनास्थळी पोहोचली. सय्यद मृतावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसताच सर्वांनी हंबरडा फोडला. सय्यदच्या अपघाती मृत्यूची माहिती उंबर्डेत कळताच मेहबूबनगरवर शोककळा पसरली. सोळांकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यावर रात्री नातेवाइकांनी सय्यदचा मृतदेह ताब्यात घेतला. तेथून रात्री उशिरा मृतदेह उंबर्डे येथे आणला. सय्यद हा वीजवितरण कंपनीत आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे वायरमन म्हणून वेंगसर गावाची जबाबदारी होती. तो शांत व मनमिळाऊ होता. सय्यदच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ आहे. सय्यदच्या अपघाती मृत्यूबद्दल उंबर्डे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)