शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नसतानाही ‘लॉन’साठी उठाठेव

By admin | Updated: March 30, 2017 01:21 IST

जिल्हा परिषद : सर्व व्यवहार संशयास्पद; बांधकामही विनापरवाना

समीर देशपांडे -- कोल्हापूर--एक स्थानिक स्वराज्य संस्था दुसऱ्या स्थानिक संस्थेला कशा पद्धतीने फाट्यावर मारू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून जिल्हा परिषदेच्या लॉन प्रकरणाकडे पाहावे लागेल. एवढेच नव्हे तर अभ्यासू आणि ज्येष्ठ म्हणवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही कुठलाही अभ्यास न करता ही ३२ लाख रुपयांची उधळपट्टी केलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महापालिकेची रीतसर परवानगी न घेता हे ३२ लाख रुपयांचे शासकीय जागेत बांधकाम करून तातडीने कंत्राटदारांचे बिलही अदा केले जाते. हा सगळाच व्यवहार संशयास्पद वाटण्याजोगा आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसमोर आपण लॉन विकसित करून भाड्याने देणार आहोत, हे कितपत योग्य आहे याचा विचार हा प्रस्ताव करताना केला गेला नाही. अगदीच जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवायचे होते तर किमान रितसर महापालिकेची परवानगी घेऊन तरी कामाला सुरुवात करायची होती. अशा पद्धतीने कामाला परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा रक्षक केबिन, त्यांच्यासाठी संडास-बाथरूम दाखवून प्रत्यक्षात लग्नासाठी वधू आणि वराच्या खोल्या करण्याची ही कसरत करण्याची एवढी गरज काय होती. हेतू कितीही प्रामाणिक असला तरी शासनाच्याच जागेवर बांधकाम करताना दुसऱ्या शासकीय यंत्रणेची परवानगी नसताना अशा पद्धतीने लाखो रुपये खर्च करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे यांनी परवानगी दिलीच क शी, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण कंत्राटदारांची ३२ लाखांची बिले २०१३ मध्ये अदा झाली आहेत आणि काही अटींवर महापालिकेने ११ जुलै २०१६ ला काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे तसेच या ठिकाणी लॉन आणि सांस्कृतिक सभागृहासाठी परवानगी मिळणार नाही, असेही स्पष्टपणे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. संजय मंडलिक अध्यक्ष, ‘स्वाभिमानी’चे सावकर मादनाईक बांधकाम समितीचे सभापती, धैर्यशील माने, अमल महाडिक, शशिकांत खोत, अभिजित तायशेटे हे अभ्यासू तत्कालीन सदस्य सूचक आणि अनुमोदक असलेला हा प्रस्ताव बेकायदेशीर आहे हे सांगण्याचे धाडसच कुणी दाखवले नाही की सगळ्यांनी मिळूनच हा ३२ लाखांचा नावीन्यपूर्ण प्रकल्प खड्ड्यात घालण्याची कामगिरी केली हा आता संशोधनाचा विषय ठरणार आहे. कारण अजूनही महापालिकेने हे काम पूर्ण झाल्याचे पत्र दिलेले नाही. सुभेदार हे बदलून गेले आहेत. वाघमारे निवृत्त झाले आहेत. मादनाईक, माने, तायशेटे आता नव्या सभागृहात नाहीत. अमल महाडिक यांच्या पत्नी आता अध्यक्ष झाल्या आहेत आणि शशिकांत खोत यांच्या पत्नी सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. अशा परिस्थितीत आता या प्रकरणाची नेमकी चौकशी तर कोण करणार आणि कारवाई कोण करणार, अशी परिस्थिती आहे. (उत्तरार्ध)‘लोकमत’च्या वृत्तानंतर महापालिकेकडे चौकशीबुधवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘लॉनवर ३२ लाखांचा चुराडा’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये खळबळ उडाली. अशा पद्धतीने परवानगी न घेताच एवढी रक्कम कशी खर्च केली गेली याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होते. त्यामुळे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांनी या प्रकरणाची फाईल मागवून घेतली. ही संपूर्ण माहिती घेतल्यानंतर किमान आता तरी बदललेल्या नियमांचा आधार घेत लॉन आणि सांस्कृतिक सभागृहाचा व्यावसायिक वापर करता येईल या यासाठीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवासस्थानासमोरील हे स्टेज ज्यासमोर झाडे उगवली आहेत.