शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संख्या घटल्याने नेत्यांसमोर पेच

By admin | Updated: October 27, 2014 00:25 IST

संचालकपदाचे राजकारण : ‘शब्द’ पाळताना होणार दमछाक

राजाराम लोंढे - कोल्हापूर -सहकारी संस्थांच्या नवीन नियमांनुसार संचालकांच्या संख्येला कात्री लागली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा साखर कारखाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना बसणार आहे. त्यांना जास्तीत जास्त २१ संचालकांचे पॅनल करावे लागणार असल्याने विधानसभा निवडणुकीत संचालकपदासाठी दिलेला ‘शब्द’ पाळताना कारखानदारांची पुरती दमछाक होणार आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सर्वच संस्थांच्या संचालक मंडळांची संख्या कमी झाली आहे. साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरणी, जिल्हा बँकांच्या संचालकांच्या संख्येला कात्री लागली आहे. पूर्वी साखर कारखान्यांच्या संचालकांची संख्या २५ आहे. बहुतांश कारखान्यांच्या निवडणुका या गटनिहाय घेतल्या जातात. गटातील मतदारसंख्येनुसार संचालकांची संख्या ठरविली जाते; पण नवीन नियमांनुसार २१ पर्यंत संचालक ठेवावे लागणार असल्याने चार जागा कमी होणार आहेत. परिणामी, कार्यक्षेत्रातील कोणत्या तरी चार गावांना पॅनलमध्ये संधी मिळणार नाही, हे नक्की आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांना संचालकपदाचे गाजर दाखविले आहे. मुळात संचालकांची संख्या २५; पण त्याच्या पाचपट लोकांना नेत्यांनी आश्वासने दिली आहेत. पूर्वीच्या संचालक मंडळात राखीव गटातून सहा व सर्वसाधारण गटातून १९ असे २५ जणांचे संचालक मंडळ कार्यरत होते. आता राखीव गटातील ‘आर्थिकदृष्ट्या मागास’ हा प्रवर्गच कमी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती/जमाती यांतून प्रत्येकी एक व दोन महिला असे राखीव गटांतील पाच सदस्य राहणार आहेत. मुळात संचालकपदासाठी प्रत्येक गावात तीन-चार इच्छुक असतात. त्यातून एकाची निवड करताना तिघांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. आता नेत्यांना कसरतच करावी लागणार आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दिलेला ‘शब्द’ पाळताना साखरसम्राटांची दमछाक होणार, हे नक्की आहे. जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रतिनिधींसह ३४ चे संचालक मंडळ कार्यरत होते; पण त्यांचीही संख्या १९ वर आल्याने तालुक्यातील नेत्यांना मुरड घालावी लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या हालचाली !विधानसभेनंतर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या कारखान्यांची सत्ताधारी मंडळी विधानसभा निवडणुकीत बाहेर आली असून, कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडून नवीन नियमावलीनुसार गट कसे तयार होणार, कोणत्या गटात किती संख्या ठेवायची, याविषयीची माहिती गोळा करण्यास सुरू झाली आहे. ‘गोकुळ’वर परिणाम नाहीकोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ मुळातच अठरांचे आहे. त्यामुळे संघाच्या पोटनियम दुरुस्ती सभेत ही संख्या २१ पर्यंत नेण्याची मागणी झाली; पण सत्तेतील वाटेकरी वाढविण्याची मानसिकता नेत्यांसह कारभारी संचालकांचीही नसल्याने ही संख्या अठराच राहिली. आगामी वर्षभरात होणार या कारखान्यांच्या निवडणुका दूधगंगा-वेदगंगा, भोगावती, छत्रपती राजाराम, डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी. असे राहणार साखरकारखान्यांचे संचालक मंडळ १५ सर्वसाधारण सदस्य 0१ संस्था प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती 0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/जमाती 0२ महिला राखीवजिल्हा बँकेचे संचालक मंडळ १२ प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी0२ महिला प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/ जमाती0२ दूध संस्था, पाणीपुरवठा, साखर कारखान्यांसह इतर गटांतूनजिल्हा बँकेचे संचालक मंडळ १२ प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी0२ महिला प्रतिनिधी0१ अनुसूचित जाती/जमाती0१ इतर मागासवर्गीय0१ भटक्या विमुक्त जाती/ जमाती0२ दूध संस्था, पाणीपुरवठा, साखर कारखान्यांसह इतर गटांतून