सावर्डे (ता. राधानगरी) येथील विद्या मंदिर सावर्डे शाळेचे अध्यापक शाहू चव्हाण यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मार्गदर्शक म्हणून शाळेचा आणि गावचा नावलौकिक केल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी भीमराव पाटील यांच्या वतीने सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी भेट व संस्था, मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी जि. प. सदस्या सविता चौगले, पं. स. सदस्या सोनाली पाटील, शिक्षण समिती निमंत्रित सदस्य डी. पी. पाटील, आदर्श शिक्षक संभाजी पाटील, कु. सृजन कुदळे व प्राजक्ता पाटील यांची मनोगते व्यक्त झाली.
कार्यक्रमास जे. टी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी ए. वाय. पाटील साहेब, केंद्रप्रमुख ब. पु. कांबळे, संभाजी पाटील, बी. एस. पाटील, आ. रा. सुतार, नामदेव रेपे, संतोष भोसले, बळिराम रेपे, गुरव सर, शाहू चौगले, दिगंबर टिपुगडे, प्रकाश पाटील, श्रीकांत मोरे, सचिन कुदळे, सुनील कुदळे, मनोज पोवार, विश्वास पाटील, विजय सुतार, अशोक आदमापुरे, संदीप वाली, बी. वाय. पाटील, अशोक एरुड़कर, आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक आप्पासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले.