शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

बगलबच्च्यांना सत्ता देण्यासाठीच नेत्यांची धडपड--शेतकरी संघ निवडणूक रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2015 00:55 IST

पी. डी. पाटील यांचा आरोप : विकासाचा अजेंडा नाही; मोहिते-नेसरीकरांच्या स्वप्नातील संघ उभारू

राजाराम लोंढे - कोल्हापूर  शेतकरी संघाची सध्याच्या परिस्थिती नाजूक आहे, यामधून संघाला बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांकडे कोणताही अजेंडा नाही. केवळ संघाला राजकीय अड्डा बनविण्यासाठी व बगलबच्यांना सत्ता देण्यासाठीच या मंडळींना सत्ता हवी असल्याचा आरोप संघाचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तात्यासाहेब मोहिते व बाबा नेसरीकर यांच्या स्वप्नातील संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पाटील म्हणाले, संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिलो; पण नेत्यांच्या डोक्यात काही वेगळेच होते. त्यांनी सवयीप्रमाणे शेवटपर्यंत झुलवत ठेवले. राजकीय द्वेषापोटी आम्हा मंडळींना त्यांनी बाजूला ठेवले असेल, पण ज्या घराण्याने संघाच्या उत्कर्षासाठी जिवाचे रान केले, त्या मोहिते घराण्याला बाजूला करण्यामागचा हेतूच समजला नाही. आतापर्यंत संघात कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. केवळ राजकीय हेतूने संघ ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असल्यामुळे सभासदांनी आम्हाला पॅनेल करण्याचा रेटा लावला. निवडणूक लागण्यासारखी संघाची परिस्थिती नव्हती, भविष्य निर्वाह निधीची गुंतवणूक चुकीची झाल्याने त्यामध्ये ४० ते ५० लाखांचा दुरावा आहे. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केल्याने तो ५० लाख फरक द्यावा लागणार आहे. संघाकडील शिल्लक पाहिली तर सध्या व्यवहार सुरळीत चालण्यासाठी चार कोटींची गरज आहे. सभासदांची संघावर कमालीची श्रद्धा आहे. आम्ही सत्तेवर असताना कर्जामुळे संघ शॉर्टमार्जिनमध्ये केला, त्यावेळी सभासदांनी घरी बोलावून आमच्याकडे ठेवी ठेवल्या. शेतकरी, ग्राहकांच्या हितासाठी संघ वाचणे गरजेचे आहे. संघ ही मार्केटिंग संस्था आहे, व्यवसाय वाढला तरच नफा वाढेल. त्यासाठी नियोजन करावे लागेल. सत्तेत आल्यानंतर जिवाचे रान करून संघाला गतवैभव मिळवून देवू. विरोधी पॅनेलमध्ये संघ वाचवून चालविण्यासाठी कोणतीही दूरदृष्टी नाही. संघाचा राजकीय अड्डा करण्यासाठीच विरोधकांना सत्ता हवी आहे, पण सभासद जाणकार व सूज्ञ आहेत. या मंडळींचा हेतू त्यांनी ओळखला असून मतपेटीद्वारे त्यांचे मनसुभे उद्ध्वस्त करतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. नेतृत्व नसल्यानेच मोहितेंना निमंत्रणसंघ चालविण्याची क्षमता नसणारे उमेदवार पाहून वसंतराव मोहिते बाजूला झाले. मोहिते यांना स्वीकृत म्हणून घेऊन त्यांच्याकडे संघाचा कारभार सोपविण्याची तयारी हसन मुश्रीफ यांनी दाखविली आहे. त्यावरून त्यांच्याकडे संघ चालविण्यासाठी सक्षम नेतृत्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोलाही पाटील यांनी हाणला. मग व्यक्तिगत प्रचार का?  सत्तारूढ पॅनेलमधील उमेदवारांना एकमेकांवर विश्वास नाही. त्यांच्यात कमालीची संभ्रमावस्था असून त्यांनी व्यक्तिगत प्रचार सुरू केल्याची टीका पी. डी. पाटील यांनी केली. संघाचा ‘बैल’ धावेल ‘बैल’ हे श्रमाचे व प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. संघाचा बैल अशक्त झाला आहे, आगामी पाच वर्षांत पुनर्वैभव मिळविल्यानंतर बैल धावू लागेल, असे पाटील म्हणाले. सत्ता द्या हे करतो....आर्थिक शिस्त व नियोजनकाटकसरीचा व पारदर्शक कारभारशाखांना बळकट करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.विक्री वाढीसाठी प्रयत्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावूगोठवलेले पगार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील(उद्याच्या अंकात : सत्तारुढ पॅनेलचे प्रमुख श्रीमती शोभना शिंदे-नेसरीकर व मानसिंगराव जाधव यांची भूमिका)कोल्हापूरच्या सहकारी चळवळीतील नावाजलेली संस्था अशी ओळख असलेल्या शेतकरी सहकारी संघाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत आहे. त्यानिमित्त रिंगणातील दोन्ही प्रमुख पॅनेल प्रमुखांच्या मुलाखती आजपासून...