शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी नेत्यांची मुले रिंगणात : शेट्टी

By admin | Updated: February 11, 2017 00:30 IST

निवडणूक रणांगण : उदगाव येथे स्वाभिमानीचा प्रचार प्रारंभ

जयसिंगपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी दिली आहे. तसेच अध्यक्षपद व लालदिव्याची हौस पूर्ण करण्यासाठी नेत्यांनी कस लावला आहे. मात्र, हे स्वप्न भंग होणार आहे. या निवडणुकीत स्वाभिमानीने अठरा पगड जातीच्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून उमेदवार जाहीर केले आहेत. या पाठबळावर ते निवडून येतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.उदगाव (ता. शिरोळ) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार प्रारंभ येथील महादेवी मंदिरात करण्यात आला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी उदगाव गावातूनच स्वाभिमानीचा उगम झाला. याच गावाच्या पाठबळावर चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे या चळवळीला बळ देण्यासाठी जिल्ह्यात २२ जिल्हा परिषद व ४४ पंचायत समितींसाठी स्वाभिमानीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आता मतदार व कार्यकर्त्यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, मतदारसंघाचाच विचार न करता बांधकाम व आरोग्य सभापतीच्या कालावधीत शिरोळ तालुक्यात ७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सध्या स्वाभिमानीतून बाहेर पडून अन्य पक्षात जाऊन अप्प्रचार करीत असलेल्या लोकांनी स्वाभिमानीच्या उमेदवारांवर केलेले आरोप खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी दिला. तसेच उदगाव हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे तो अजिंक्य ठेवण्याचे काम कार्यकर्त्यांनीच केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रकाश बंडगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, आप्पासाहेब खर्डेकर, वसंत हजारे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मेघराज वरेकर यांनी संघटनेला दहा हजार रुपयांची देणगी दिली.याप्रसंगी दीपाली ठोमके, मन्सुर मुल्लाणी, सरपंच स्वाती पाटील, गुंडा कोरे, प्रशांत हरणे, जालिंदर ठोमके, फरीद नदाफ, तात्यासो देसाई, आदिनाथ हेमगिरे, सागर चिपरगे, महेश ठोमके, शांताराम पाटील, श्रीराम चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)उदगाव (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानीचा प्रचार प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना खा. राजू शेट्टी. व्यासपीठावर सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, दीपाली ठोमके, सुनीता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.