शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठी उमेदवाराविरुद्ध महाराष्ट्रातील नेत्यांनी बेइमानी करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST

बेळगाव : महाराष्ट्रातील नेत्यांनी अथवा कोणत्याही पक्षाने बेळगावात येऊन मराठी भाषिक उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्याची बेइमानी करू नये. मराठी माणसांची ...

बेळगाव :

महाराष्ट्रातील नेत्यांनी अथवा कोणत्याही पक्षाने बेळगावात येऊन मराठी भाषिक उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्याची बेइमानी करू नये. मराठी माणसांची येथे जी एकजूट होताना दिसत आहे, त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका, असे आवाहन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बेळगावला आलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केले.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काल मुख्यमंत्री येडियुरप्पा आले होते. आज भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बेळगावला येत आहेत. भाजप आपली पूर्ण ताकद लावत आहे. काँग्रेस अथवा भाजपने ताकद लावली, यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, महाराष्ट्रातील नेत्यांनी अथवा कोणत्याही पक्षाने येथे येऊन मराठी भाषिक उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्याची बेइमानी करू नये. भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा या चळवळीशी तसा संबंध नाही. भावनिक गुंतवणूक नाही. तथापि मराठी म्हणून तरी तुम्ही येथील मराठी बांधवांसाठी हे पाप करू नका, असे माझे त्यांना आवाहन आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

कालची मिरवणूक व सभेचे चित्र पाहता भाजप व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात थेट लढत होईल, असे मला वाटते. खूप वर्षांनंतर अशी थेट लढत होत असून, महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेला मानणारा मतदार ताकदीने उतरला, मजबुतीने उतरला तर शुभम शेळके हे नक्की शिवसेना समितीचे लोकसभेतील १९वे आमदार आणि संसदेतील २२वे खासदार असतील.

यावेळी खासदार धैर्यशील माने, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी, शिवसेना संपर्कप्रमुख अरविंद नागणुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, संग्राम कुपेकर, मदन बामणे, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शिवसेना संघटक दत्ता जाधव, यांसह इतर समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.