...............
राजकीय जीवनाच्या त्रेचाळीस वर्षांच्या कालावधीत पी. एन. पाटील यांनी खूप चढ-उतार पाहिले. यश-अपयश या तात्कालिक गोष्टी असतात; पण पी. एन. पाटील यांनी आपल्या तत्त्वाशी आणि विचारांशी कधीही तडजोड केली नाही. आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि साथीदारांच्या सहकार्याने सहकार चळवळीतील कार्य, राजकारण आणि राजकारणातून सामान्यांना उभे करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. गेल्या वीस वर्षांत बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अनेकांनी पक्षांतर केले; पण आमदार पी.एन. पाटील यांनी आपली राजकीय निष्ठा चाळीस वर्षांहून अधिक काळ अबाधित ठेवली. निवडणुकीत प्रसंगी एकट्यानेच निकराची लढाई केली आणि यावेळी प्रतिकूल स्थितीतही विधानसभा खेचून आणली.
सहकाराच्या माध्यमातून मतदारसंघात समृद्धीचा व विकासाचा मार्ग सुरू ठेवला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते दीर्घकाळ संचालक आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वांत कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय संपूर्ण देशभरात क्रांतिकारक ठरला. सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक वसंत फुलविण्याचे काम त्यांनी केले. याबरोबरच राजीवजी सूतगिरणीची उभारणी करून हजारो तरुणांच्या हाताला त्यांनी काम दिले. लघु उद्योजकांना दादा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून अनेक बेरोजगारांना सक्षमपणे उभे करण्याचे काम केले. काँग्रेस पक्षावर त्यांची निष्ठा आहे. अनेक आमिषे डावलून त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहण्याचा वसा जोपासताना सामान्य कार्यकर्ता हेच दैवत आणि समाजाचा विकास हेच ध्येय म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे. कार्यकर्ता आपला सहकारी आणि जनता आपली माय-बाप आहे, ही भूमिका त्यांची ठाम आहे. जनतेच्या विचारांशी समतोल आणि विचारांचा आदर करणारे राजकारण पी. एन. पाटलांनी केले. आमदार पी. एन. पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळून निष्ठेचे व स्वच्छ प्रतिमेचे राजकारण केले आहे. जय-पराजयाने ते कधीही खचले नाहीत. सत्ता असो अथवा नसो, शासकीय कार्यालयांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या शब्दाचा दरारा कायम आहे.
............
दगडू पाटील जैताळकर,
माजी तंटामुक्त अध्यक्ष