शहापूर येथील कोकणे गल्लीत मटका घेणाऱ्या शामराव सुऱ्याप्पा देशिंगे (वय 54, रा. कोकणे गल्ली, शहापूर) याला अटक करून त्याच्याकडून १ मोबाइल व रोख रक्कम असा १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मालक संदीप साळुंखे (रा. इचल.) हा फरार आहे. तसेच सर्वेेश गंगाराम पाटील (वय 21, रा. कबनूर) याला इचलकरंजी ते कोरोची मार्गावर पंचगंगा साखर कारखान्यासमोर मोटरसायकल (एम.एच.- 11 बी.टी.- 8113) वरून विदेशी दारूच्या ६६ सीलबंद बाटल्या बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूच्या बाटल्या व मोटरसायकल असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मटका, दारू वाहतूकवर एलसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST