शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीच!

By admin | Updated: September 8, 2014 23:27 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) की जकात, याचा निर्णय शासनाने महापालिकांवर सोपविला. मात्र, कोणत्या कराची अंमलबजावणी करावी, याबाबत शासनाने पुढे मार्गदर्शन केले नाही. परिणामीे महापालिकेला मोठ्या

वसुलीची तयारी : आयुक्तांच्या मार्गदर्शनात मॅराथॉन बैठकअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) की जकात, याचा निर्णय शासनाने महापालिकांवर सोपविला. मात्र, कोणत्या कराची अंमलबजावणी करावी, याबाबत शासनाने पुढे मार्गदर्शन केले नाही. परिणामीे महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरावतीत एलबीटीच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली एलबीटी वसुली आराखड्याची बैठक पार पाडली. यावेळी येथील एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव, उपायुक्त अरविंद औगड, लेखा परीक्षक राहुल ओगले, लेखापाल शैलेंद्र गोसावी, एलबीटी अधीक्षक सुनील पकडे, उद्योजक प्रवीण काशीकर, पुरुषोत्तम बजाज आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त अरुण डोंगरे यांनी येथील एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कच्च्या मालावर आकारल्या जाणाऱ्या एलबीटीमध्ये ०.५ टक्के एलबीटीत सूट दिली जात आहे. मात्र, अनेक उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल येत नाही, तरीही या व्यावसायिकांना कच्च्या मालाच्या नावाखाली एलबीटीत ०.५ टक्के सट दिली जात असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. इतकेच नव्हे तर अनेक उद्योगधंदे बंद झाले असून या इमारती गोदाम म्हणून भाड्याने दिल्या आहेत. यातून अर्थार्जन सुरु असताना सुध्दा कर भरण्यास कुचराई केली जात असल्याचे वास्तव आयुक्तांनी मांडले. शहरात येणाऱ्या कच्च्या मालावर लक्षशहरात बाहेरुन येणाऱ्या कच्च्या मालावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एमआयडीसीमध्ये उद्योगधंद्यांना कच्च्या मालावर एलबीटीमध्ये ०.५ टक्के सूट दिली जात आहे. मात्र, कच्च्या मालाऐवजी बाहेरुन तयार माल आणून विकण्याचा प्रकार सुरु आहे. अशा उद्योगधंद्याना लक्ष्य करुन कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.१० हजार ४०७ व्यावसायिकांची नोंदमहापालिकेत एलबीटीचा भरणा करण्यासाठी १० हजार ४०७ व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ‘व्हॅट’ भरणारे ४३०० व्यावसायिक नियमितपणे एलबीटीचा भरणा करीत असल्याची माहिती आहे. उर्वरित व्यावसायिकांमध्ये काही किरकोळ तर काही घाऊक व्यावसायिक आहेत. आॅगस्ट महिन्याचे एलबीटीचे उत्पन्न ५ कोटी, ३७ लाख, ७७ हजार, ४२४ रुपये प्राप्त झाल्याची माहिती जकात अधीक्षक सुनील पकडे यांनी दिली.