शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’ची गाडी रुळांवर

By admin | Updated: September 19, 2014 00:30 IST

४२ कोटींचा टप्पा पार : दसरा-दिवाळीनंतर जोर वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : राज्य शासनाकडून एलबीटीला (स्थानिक संस्था कर) पर्याय देण्याची जोरदार तयारी सुरू झाल्यानंतर मार्चनंतरच्या अडीच महिन्यांत महापालिकेची घसरलेली एलबीटीची गाडी आता रुळांवर येत आहे. पहिल्या अडीच महिन्यांत फक्त १६ कोटी रुपये एलबीटी जमा झाल्यानंतर त्यानंतरच्या चार महिन्यांत एलबीटी वसुलीने २१ कोटींचा टप्पा पार करत मुद्रांक अधिभारासह एकूण ४२ कोटींपर्यंत मजल मारली आहे. जकात हा महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत होता. महापालिकेला जकातीमधून १२५ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत होते. जकातीचा हुकमी उत्पन्नाचा स्रोत बंद करून शासनाने स्वयंमूल्यांकनावर आधारित एलबीटी ही नवीन करप्रणाली तीन वर्षांपूर्वी सुरू केली. जकात रद्द झाल्याने फटाके वाजविणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या करप्रणालीस विरोध के ला.पहिल्या वर्षी २०११-१२ ला ६८ कोटी, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८३, तर मागील वर्षी २०१३-१४ मध्ये ९२ कोटी एलबीटीतून महापालिकेला मिळाले. एलबीटीमधून महापालिकेला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असतानाच शासनाने एलबीटी रद्दचा घाट घातला. परिणामी, नियमित एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांनीही पैसे भरण्याकडे पाठ फिरविली होती. आता पुन्हा एलबीटीला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)एलबीटीबाबत अद्याप ठोस निर्णय प्रलंबित असला तरी महापालिकेच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यांत चांगली वसुली झाली आहे. दसरा-दिवाळीनंतर यामध्ये आणखी वाढ होईल. व्यापाऱ्यांनीही महापालिकेला एलबीटी भरून सहकार्य करावे.- संजय सरनाईक (एलबीटी प्रमुख)एलबीटीबाबत अद्याप ठोस निर्णय प्रलंबित असला तरी महापालिकेच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यांत चांगली वसुली झाली आहे. दसरा-दिवाळीनंतर यामध्ये आणखी वाढ होईल. व्यापाऱ्यांनीही महापालिकेला एलबीटी भरून सहकार्य करावे.- संजय सरनाईक (एलबीटी प्रमुख)वसुलीवर दृष्टिक्षेपएप्रिल : ५ कोटी ५२ लाखमे : ६ कोटी ५ लाखजून : ६ कोटी ५९ हजारजुलै : ९ कोटी १४ लाखआॅगस्ट : ६ कोटी ३० लाख१७ सप्टेंबरपर्यंत : ३ कोटी ३४ लाख