शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रश्नी सात हजार व्यापाऱ्यांची यादी तयार

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

माहिती संकलन सुरू : चित्रीकरण करून करपात्र रक्कम निश्चित होणार

सांगली : एलबीटी न भरणाऱ्या सात हजार व्यापाऱ्यांची नोंद महापालिकेच्या दफ्तरी झाली असून अशा सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांमधील मालाची चित्रीकरणासह माहिती संकलीत केली जाणार आहे. त्यानंतर रक्कम निश्चित करून त्यांना त्याबाबत नोटीसा बजावण्यात येतील, अशी माहिती आयुक्त अजिज कारचे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कारचे म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील २२ ते २३ हजार व्यापारी, व्यवसायिकांची तपासणी महापालिका प्रशासनाने केली होती. कर भरण्यास पात्र असलेले १५ हजारावर व्यापारी निश्चित झाले आहेत. यातील जवळपास ४00 व्यापाऱ्यांच्या एलबीटीची रक्कम निश्चित झाली आहे. अन्य व्यापाऱ्यांच्या दुकानांमधील मालाची माहिती घेऊन किंवा येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून विवरणपत्र घेऊन रक्कम निश्चितीचे काम सुरू आहे. अद्याप ७ ते ८ हजार व्यापारी एलबीटी भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. सात हजारावर व्यापाऱ्यांची नोंद करुन त्यांची रक्कम निश्चित करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. माहिती संकलनाच्या कामाला व्यापारी छापा समजत आहेत. त्यांनीच विवरणपत्र जमा केले तर आम्हाला दुकानातून माहिती घेण्याची गरज नाही. त्यामुळे आमचे अधिकारी दुकानात जाऊन प्रत्यक्ष मालाची पाहणी करून, त्याचे चित्रीकरण करून माहिती संकलीत करीत आहोत. रक्कम निश्चित करण्याबरोबरच अशा व्यापाऱ्यांना कर भरण्याच्या नोटिसा दिल्या जातील. जे व्यापारी नोटिसा प्राप्त झाल्यानंतर कर भरतील, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जे कर भरणार नाहीत त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी कायद्यातील तरतुदींचा वापर केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)