शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रश्नी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

By admin | Updated: June 18, 2015 00:38 IST

विवेक कांबळे : कोल्हापुरात आयोजन; पाच महापालिकांचा समावेश

सांगली : ‘एलबीटी’च्या गोंधळामुळे महापालिका आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. या प्रश्नांसह इतर समस्यांबाबत उद्या, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कोल्हापूर येथे बैठक होत आहे. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच महापालिकांचे महापौर उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगलीचे महापौर विवेक कांबळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, उद्या मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी महापौरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या पाच महापालिकांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यापासून आर्थिक स्थिती ढासळली आहे. व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने एलबीटीची कोट्यवधींची थकबाकी आहे. दोन वर्षांत पालिकेला २३१ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात शासनाने अभयदान योजना लागू केल्याने व्यापाऱ्यांकडील वसुली थांबली आहे. त्याचा विपरीत परिणाम विकासकामांवर होत आहे. पालिका हद्दीत केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारणसह आरोग्यविषयक योजना कार्यरत आहेत. त्या ७५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. २५ टक्के निधी पालिकेकडे नसल्याने योजनेच्या पूर्ततेबाबत साशंकता आहे. एलबीटीपोटीची अभयदान योजना स्थगित करावी, अशी मागणी केली जाणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात याचिकाएलबीटी रद्द करून जकात लागू करावी, या मागणीसाठी महापौर विवेक कांबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेचे उच्च न्यायालयातील वकील सुधीर प्रभू यांना दावा दाखल करण्याची सूचना केली आहे. येत्या दि. २२ अथवा २३ रोजी न्यायालयात याचिका दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.