शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

लक्ष्मीपूजनाचे पैसे, दागिन्यांवर डल्ला

By admin | Updated: November 14, 2015 00:29 IST

कवठेपिरानची घटना : लाखाचा ऐवज लंपास

सांगली : लक्ष्मीपूजनानिमित्त पूजलेले पैसे व दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. कवठेपिरान (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. चोरट्यांनी दोन घरात पूजलेले सोन्याचे दीड व एक तोळ्याचे असे दोन गंठण व ३१ हजार दोनशे रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित लक्ष्मण कांबळे व प्रकाश रामचंद्र देसाई हे दोघे शेजारी राहतात. कांबळे यांनी लक्ष्मीपूजनाला बाराशे रुपयांची रोकड पूजली होती. एक तोळ्याचे गंठण लक्ष्मीच्या प्रतिमेस घातले होते. देसाई यांनीही तीस हजाराची रोकड पूजली होती. दीड तोळ्याचे गंठण लक्ष्मीच्या प्रतिमेस घातले होते. या दोन्ही कुटुंबांनी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर हे कुटुंब जेवण करण्यासाठी दरवाजा उघडा ठेवून आतील खोलीत बसले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्याने दोन्ही घरात प्रवेश करुन गंठण व रोकड लंपास केली. जेवण केल्यानंतर हे कुटुंबीय बाहेर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याचा संशय आहे. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. पण अद्याप काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)गाय विकलीदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वी गाय विकली होती. त्याचे तीस हजार रुपये आले होते. ही रक्कम त्यांना कौटुंबिक कारणासाठी लागणार होती. लक्ष्मीपूजनाला ही रक्कम पूजल्यानंतर ते पुढील कामासाठी त्याचा वापर करणार होते. पण तोपर्यंत चोरट्यांनी या रकमेवर डल्ला मारला.