शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या ‘ज्योतिपुंज’मध्ये लक्ष्मणराव इनामदारांचा उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 23:15 IST

खटावकरांचा गौरव : गुजरातमधील संघाच्या स्थापनेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा

नम्रता भोसले ल्ल खटाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात त्यांचे खटावचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्याबद्दल उल्लेख केला आहे. यानिमित्ताने सातारा जिल्हा अन् खटावचा अप्रत्यक्षपणे सन्मानच झाला आहे, अशी भावना खटाव ग्रामस्थांची झाली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरून पोस्ट फिरवली जात आहे. गुजरातमध्ये ‘वकीलसाहेब’ म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत लक्ष्मणराव माधवराव इनामदार यांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ रोजी सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये झाला. त्यांचे पूर्वज श्रीकृष्णराव खटावकरांनी शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी सेवा केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूजी महाराज यांनी त्यांना इनाम म्हणून जमीन आणि ‘सरदार’ ही उपाधी दिली होती. त्यावेळेपासून या परिवाराला ‘इनामदार’ नावाने ओळखले जाऊ लागले. लक्ष्मणराव कदम यांचे कुटुंब मोठे होते. कुटुंबात सात भाऊ, दोन बहिणी आणि चार विधवा आत्या तसेच त्यांची मुले असे मोठे एकत्र कुटुंब. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची याही परिस्थितीत वडील आणि आजोबांनी कुटुंबाला एकत्र राहण्याची ताकद दिली. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरही त्यांचे संस्कार रुजले होते. त्यांचे शिक्षण खटाव तसेच सातारा येथे झाले. १९३९ मध्ये साताऱ्यामध्ये विधी शाखेतून शिक्षण घेत असताना हैद्राबाद निजामच्या विरुद्धचे आंदोलन जोरात सुरू होते. त्यावेळी लक्ष्मणरावांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून समवेत दीडशे महाविद्यालयीन मुलांना बरोबर घेऊन या आंदोलनात भाग घेतला. १९४३ मध्ये प्रचारक म्हणून गुजरातमधील नवसारी गावात पाठवण्यात आले. १९५२ मध्ये ते गुजरात प्रांताचे मुख्य प्रचारक बनले. आणि त्याच्याच प्रयत्नातून पुढील चार वर्षांत त्यांनी दीडशे शाखा स्थापन केल्या. आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांच्याकडे असलेली कला तसेच लहान-लहान कार्यकर्त्यांची काळजी घेत असताना प्रकृती निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जोड असावी यादृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा. संघाचे कार्य करताना कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार नाही, याविषयी विशेष लक्ष असायचे. स्वयंसेवकांची जपणूक तसेच त्याचे मन व त्याच्या संस्काराची जपणूक करण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. संघाचे मुख्य प्रचारक म्हणून कार्यरत असताना गुजरातमध्ये पडणारा दुष्काळ, पूर, भूकंप, मीनाक्षीपुरम कांड या आपत्ती काळात त्यांनी हिंमतीने सामना केला. गुजरातमध्ये संघ कार्याचे शिल्पकार लक्ष्मणराव इनामदार यांचा मृत्यू १५ जुलै १९८५ मध्ये पुणे येथे झाला. गुजरातमध्ये केवळ संघच नाही तर संघ कार्याने पे्ररित होऊन केलेल्या कार्याच्या खुणा तसेच विचारांचा प्रभाव दिसून येतो.