शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शरावती, चालुक्य एक्स्प्रेसमधून लाखाचा ऐवज लंपास

By admin | Updated: February 27, 2016 00:41 IST

मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद

मिरज : दादर-म्हैसूर शरावती एक्स्प्रेस व यशवंतपूर-दादर चालुक्य एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी दोन प्रवासांच्या बॅगा चोरून एक लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. दादर ते म्हैसूर शरावती एक्स्प्रेसमधून शीतल शशिकांत गायकवाड (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, कर्जत, जि. रायगड) ही महिला एस ३ या आरक्षित बोगीतून प्रवास करीत होती. त्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. पर्समध्ये अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र, चार हजार रोख रक्कम, मोबाईल असा ७० हजारांचा ऐवज होता. दुसऱ्या घटनेत बंगलोर येथे सेल्समनचे काम करणाऱ्या आबिद बर्मुद्दीन हुसेन (३२, रा. बंगलोर) या प्रवाशाची यशवंतपूर ते दादर जाणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीतून बॅग चोरण्यात आली. बॅगेत २५ हजाराचा मोबाईल, रोख रक्कम, कपडे असा ३१ हजारांचा ऐवज होता. याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज स्थानकात चोरट्यांनी महिलेचे दीड लाखाचे सोन्याचे घंठण लंपास केले. रेल्वेत चोरट्यांच्या उपद्रवामुळे प्रवासी त्रस्त आहेत. पुणे ते मिरज दरम्यान प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असून त्यांच्या प्रतिबंधासाठी रेल्वे पोलिसांची धावपळ सुरू आहे.