कोल्हापूर : पर्यावरण बदलाचे संकट कोरोनापेक्षा कैकपटींनी मोठे आहे, याची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमास प्रारंभ झाला.न्यू पॅलेस येथील राजवाड्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर आणि फ्रायडेज फॉर फ्युचर, कोल्हापूर यांच्यातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी हा विशेष उपक्रम पार पडला.असा आहे उपक्रमपर्यावरणसंबंधी एक चित्रफीत तयार करण्यात आली असून त्यासोबत एक प्रश्नावली आहे. ती सोडवल्यास शिवाजी विद्यापीठाचे इ-सर्टिफिकेट सहभागी होणाऱ्या प्रत्येकास मिळणार आहे. या चित्रफितीमधून नागरिकांनी प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणावा, असा यामागे प्रयत्न आहे.या उपक्रमाचा प्रारंभ करताना शाहू छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, औद्योगिक क्रांती झाल्यामुळे मानवाचे कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज आपल्याला त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. येत्या काळात भारतासमोर असलेल्या प्रश्नांपैकी मुख्य प्रश्न पाणी आणि प्रदूषणाचा आहे. पर्यावरणाचे आरोग्य राखले गेले तरच पुढची पिढी चांगले आयुष्य जगू शकेल आणि त्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.मागील पिढीने केलेली चूक पुसून टाकणे आणि पुन्हा तसे न होऊ देणे अशा प्रातिनिधिक स्वरूपात मातीमध्ये उमटलेली मानवाची पावले मिटवून या उपक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन करण्यात आले.वैयक्तिक स्तरावर कार्बन फूटप्रिंट कमी करणे आवश्यक असून त्यासाठी रिड्युस, रियूज आणि रिसायकल असा मंत्र प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे, असे सांगत फ्रायडेज फॉर फ्युचर, कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रमुख नितीन डोईफोडे यांनी या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.याप्रसंगी ॲड. रवी शिराळकर, सागर बकरे, सविता पाटील, योगेश माळी, सारिका बकरे, धीरज चौगुले, अरुणा डोईफोडे, सौरभ कापडिया आणि अथर्व डोईफोडे उपस्थित होते.
World Environment Day : पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती उपक्रमास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:05 IST
पर्यावरण बदलाचे संकट कोरोनापेक्षा कैकपटींनी मोठे आहे, याची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमास प्रारंभ झाला.
World Environment Day : पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती उपक्रमास प्रारंभ
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती उपक्रमास प्रारंभजागतिक पर्यावरण दिन : शाहू महाराज यांच्या हस्ते मोहीम