लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : गारगोटी येथील आझाद गल्ली व वाणी गल्ली येथे गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा प्रारंभ राधानगरी, भुदरगड, आजराचे युवक नेते राहुल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल देसाई म्हणाले, विरोधक चुकीच्या पद्धतीने विरोध करीत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येत आहेत; पण या शहरातील नागरिक सुज्ञ असल्यामुळे याचे उत्तर त्यांना योग्यवेळी योग्य पद्धतीने देतील.
यावेळी सरपंच संदेश भोपळे, सदस्य प्रकाश वास्कर, अलकेश कांदळकर, बजरंग कुरळे, अस्मिता कांबळे, सविता गुरव, सचिन देसाई, माजी सरपंच सुनीता नलवडे, जितू भाट, किरण पिसे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.