शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

लोटे सीइटीपीत २५ लाखांचा गैरव्यवहार

By admin | Updated: December 16, 2014 23:48 IST

गुन्हा दाखल : लेखा परीक्षकाची तक्रार

खेड : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या लोटे एमआयडीसीतील सीइटीपी (सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र)चे काम पाहणाऱ्या लोटे पर्शराम एनव्हायर्नमेंट प्रोटेक्शन को-आॅप़ सोसायटी लि़ , लोटे या संस्थेमध्ये २५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षक सुनील विठ्ठल सासवडकर (४७, मूळ अहमदनगर, सध्या चिपळूण) यांनी आज, मंगळवारी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे़ याप्रकरणी सीइटीपी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील शिवराम शिर्के (लोटे) आणि व्यवस्थापक नितीन सुभाष डगरे (चिपळूण) यांच्या विरोधात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खेड तालुक्यातील लोटे सीइटीपीचे तत्कालीन संचालक श्रीराम नारायण खरे यांनी २००४-२००५ काळात गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करीत लेखा परीक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी २७ सप्टेंबर २०१२ रोजी दिलेल्या आदेशानुसार सुनील सासवडकर यांनी या संस्थेचे लेखापरीक्षण केले आहे. हे लेखापरीक्षण याअगोरच्या लेखापरीक्षक प्रज्ञा ओक यांनी केले होते़ सासवडकर यांनी १ मार्च २०१३ रोजी या संस्थेचे फेरलेखापरीक्षण केले. यामध्ये गैरव्यवहार आणि दोष आढळून आले. त्यानुसार सासवडकर यांनी संबंधित संचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. मात्र, यातील केवळ पाचजणांनी आपले म्हणणे मांडले, तर तत्कालीन अध्यक्ष सुनील शिर्के यांना सलग पाच नोटिसा पाठविण्यात आल्या. मात्र, एकाही नोटिसीचा खुलासा ते समाधानकारक देऊ शकले नाहीत. शिवाय या संस्थेचे व्यवहार पाहणारे नितीन सुभाष डगरे यांनाही नोटीस पाठवून ती स्वीकारली नसल्याने त्यांची असहमती लक्षात घेऊन अखेर सासवडकर यांनी आपला लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला.या संपूर्ण प्रकरणामध्ये तत्कालीन अध्यक्ष सुनील शिर्के आणि व्यवस्थापक नितीन डगरे यांच्याविरुद्ध संचालक मंडळाला अंधारात ठेवून परस्पर खर्च झाल्याचे दाखविणे, तशी खोटी कागदपत्रे रंगवून अपहार करणे, नियमबाह्य खर्च करणे आणि संगनमताने फसवणूक करणे या आरोपाखाली खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४०६, ४०८, ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)काय आहे गैरव्यवहार?संस्थेची रोजकीर्द, पासबुक, लेजर्स आणि धनादेशांच्या झेरॉक्स यांची तपासणी केली असता १६ लाख ६७ हजार ९६७ रुपये अनियमित खर्च आणि ८ लाख ८९ हजार २८१ रुपये नियमबाह्य खर्च मिळून २५ लाख ५७ हजार २४८ रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला आहे, असे लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले.