शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘शाहू’चा गत हंगामासाठी २७५० रुपये अंतिम दर

By admin | Updated: July 23, 2014 23:50 IST

२०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर

कागल : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गत २०१२-२०१३ च्या हंगामात गळितास आणखी ५० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. त्यामुळे गत हंगामाचा अंतिम दर २७५० रुपये झाला आहे.विविध ऊस जातींसाठी दिलेले प्रतिटन ७० आणि १२० रुपये यांचा विचार करता ऊसदर २८२० ते २८७० रुपये झाला आहे. तसेच २०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, संचालक अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, विजयसिंह जाधव, टी. ए. कांबळे, आदी उपस्थित होते.सन २०१२-१३ साठी आलेल्या उसाला यापूर्वी २७०० रुपये प्रतिटन अदा केलेले आहेत. त्या हंगामात ८६०३२ या ऊस जातीला प्रतिटन ७० रुपये, तर ६७१ या ऊस जातीसाठी १२० रुपये जादा दर दिला आहे. अंतिम हप्त्याची रक्कम प्रतिटन ५० रुपयेमधून भागविकास निधी वजा जाता ३५ रुपयांप्रमाणे होणारी दोन कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये रक्कम ३० जुलै २०१४ रोजी बॅँकेत वर्ग केली जाणार आहे. २७५० रुपये हा ऊसदर राज्यात सर्वाधिक आहे. याचबरोबर गत गळीत हंगाम २०१३-१४ साठीही ऊस जात अनुदान आणि १०० टक्के ऊसपुरवठा करणाऱ्यांसाठी प्रतिटन ५० रुपये अनुदानाची घोषणा सर्वसाधारण सभेत विक्रमसिंह राजेंनी केली होती. त्यानुसार अनुदानाची रक्कम चार कोटी पाच लाख ८७ हजार रुपये ही ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. १०० टक्के ऊसपुरवठा करणारे सर्वसाधारण ९२०० इतके शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसासाठी १ कोटी २६ लाख रुपये अदा केलेले असून उर्वरित १ लाख टनासाठी असे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या गतसाली झालेल्या ऊस हंगामासाठी पहिला हप्ता २४०० रुपये, ऊस जात अनुदान ७० ते १२० रुपये आणि १०० टक्के ऊसपुरवठा अनुदान ५० रुपये असा २५२० ते २५७० रुपये याप्रमाणे दर दिला असून, लवकरच दुसऱ्या हप्त्याची घोषणा करण्यात येईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...मंत्री हसन मुश्रीफ यांचा संताजी घोरपडे कारखाना यावर्षी सुरू होत आहे. संजय घाटगे यांनीही ‘खांडसरी’ची घोषणा केली आहे. या प्रश्नावर समरजितसिंह घाटगे म्हणाले की, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; कारण शाहू दूध संघ चालविताना आलेला अनुभव मोठा आहे. उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिले तर स्पर्धा ही अटळ आहे. छत्रपती शाहू साखर कारखान्यावर आणि राजेंवर विश्वास असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आमच्या कारखान्याला स्पर्धेची चिंता नाही.