शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शहीद राजेंद्र तुपारेंना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 01:43 IST

कार्वेत अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती

कोल्हापूर/चंदगड : अमर रहे... अमर रहे, शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना मजरे कार्वे (ता. चंदगड ) येथे लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी लष्कराच्यावतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.शहीद तुपारे यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, बेळगावचे आमदार संजय पाटील, माजी आमदार भरमूअण्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मराठा लाईट इन्फन्ट्री युनिटचे ब्रिगेडीअर प्रवीण शिंदे यांनीही शहीद राजेंद्र तुपारे यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी शहीद राजेंद्र तुपारे यांचे वडील नारायण तुपारे, पत्नी शर्मिला, पुत्र आर्यन आणि वैभव यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शहीद तुपारे यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव मंगळवारी सकाळी ८.३० वाजता बेळगाव (पान ११ वर)येथील मिलीटरी कँपमधून सजविलेल्या वाहनातून त्यांच्या मूळ गावी मजरे कार्वे येथे आणण्यात आले. यावेळी गावात संपूर्ण गावात तुपारे यांच्या श्रद्धांजलीचे फलक, भगव्या पताका, तर गल्लीमध्ये रांगोळी व फुलांचा सडा घालण्यात आला होता. गावाच्या प्रवेशद्वारावर लाडक्या सुपुत्राचे पार्थिव येताच ‘राजेंद्र तुपारे’ अमर रहे..अमर रहे अशा घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर महिलांनी पार्थिवाचे औक्षण केले. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी पार्थिव घरी नेण्यात आले. वडील नारायण तुपारे, आई शांता, पत्नी शर्मिला, मुले आर्यन आणि वैभव, भाऊ अनंत व संदीप तसेच नातेवाईकांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यानंतर गावातून शहीद तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर त्यांंचे पार्थिव महात्मा फुले हायस्कुल व गुरुवर्य म.भ.तुपारे ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या खास शामियानात उपस्थित जनसमुदायाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी लष्करी जवानांनी मानवी साखळी तयार करुन शहीद तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहीद तुपारे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज शहीद तुपारे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या हाती लष्कराच्या वतीने अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच कुटुंबियांनी शहीद तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली. यानंतर फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर पार्थिव आणण्यात आले. यावेळी वडील नारायण तुपारे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन सुपुत्रास अखेरची मानवंदना दिली. लष्कराच्या १४ जवानांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहीद तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर शहीद तुपारे यांचे पुत्र आर्यन व बंधृ अनंत यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी अमर रहे... अमर रहे शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा शोकाकुल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुभाष सासने, मेजर महेंद्र घाग, व्हाईट आमीर्चे प्रमुख अशोक रोकडे, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील, राजेश पाटील, विजय देवणे, मजरे कावेर्चे सरपंच अशोक कांबळे यांच्यासह तालुक्यातील माजी सैनिक, जि. प. व पं. स.चे सदस्य यांच्यासह शासकीय व लष्करी अधिकारी, जवान आणि बेळगाव, कोल्हापूर परिसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी लष्करी व पोलीस जवानाबरोबरच व्हाईट आर्मीच्या जवानांनीही मोलाचे योगदान दिले. शासनाची १५ लाखांची मदतशहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या हौतात्म्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने १५ लाखाचा निधी जाहीर केला आहे. याबाबतचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आलेला संदेश यावेळी जाहिर करण्यात आला.पाकिस्तानी ध्वजाचे दहन‘कुदनूर येथील तरुणांनी ‘जला दो..जला दो..पाकिस्तान जला दो..पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा संतप्त व तीव्र घोषणांनी कुदनूर बसस्टॉपवर पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करून निषेध नोंदविला.तालुका बंद ठेवून श्रद्धांजलीतालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठा, विविध संस्थांनी बंद पाळून लाडक्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली.