शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

शेवटच्या पाच मिनिटांत सामना हरलो

By admin | Updated: January 15, 2015 00:11 IST

यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...

के एमसीचा संघ प्रथमच काश्मीर येथे अखिल भारतीय महापालिका संघांच्या स्पर्धेसाठी गेला होता. काश्मीर येथील संघाविरोधात सामन्यात खेळताना शेवटच्या पाच मिनिटांत आमच्याच संघाविरोधात स्वयंगोल झाला आणि आम्ही सामना हरलो. यात मला काश्मीरच्या खेळाडूचा दात लागला... असा किस्सा महाकाली तालीम मंडळ व केएमसी संघाचे माजी फुटबॉलपटू नेताजी पाटील सांगत होते.सत्तरीच्या दशकात केएमसीचा संघ काश्मीर येथे गेला होता. या सामन्यात मी आमच्यावर स्वयंगोल झाल्याने सतर्कच होतो. पुन्हा आक्रमण झाल्याने मी चेंडू बाहेर काढताना काश्मीर संघाच्या आघाडीच्या खेळाडूचा दात मला लागला. डॉक्टरने मैदानावरच हातावर शस्त्रक्रिया करीत टाके घातले. तरीही मी हा सामना खेळलो. आम्ही हरलो; मात्र हा क्षण माझ्या कायम ध्यानात राहिला. सांगलीमध्ये त्या काळात ‘आरवाडे चषक फुटबॉल स्पर्धा’ प्रसिद्ध होत्या. मी महाकाली तालीम संघाकडून खेळत होतो. आमचा सामना शिवाजी तरुण मंडळाविरोधात पडला. तीन दिवस आमची बरोबरीच राहिली. त्यामुळे शेवटच्या क्षणात आमच्या खेळाडूने गोल नोंदवीत सामना १-० असा जिंकला. ‘शिवाजी’कडून अरुण नरके, चंदू साळोखे हे खेळत होते. त्याकाळी सलग नऊ ते दहा वर्षे कोल्हापुरातील स्पर्धांमध्ये आम्ही विजयीच राहिलो होतो. शाहू स्टेडियम येथे डिचोला गोवा विरुद्ध केएमसी असा अंतिम सामना होता. मात्र, आमची आंतर महापालिका स्पर्धेसाठी कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) येथे निवड झाली; त्यामुळे आम्ही कलकत्त्याला निघून गेलो आणि डिचोली संघास बोरगावकर चषक बहाल करण्यात आला. माझ्याबरोबर प्रभाकर मगदूम, प्रभाकर सुतार, पंडित पोवार, दिलीप सरनाईक, मंगल शिंदे, भाऊ सरनाईक, संपत मंडलिक, दिलीप माने, बाजीराव मंडलिक; ‘शिवाजी’कडून दिलीप कोठावळे, ‘एस.टी.’चे बाबू घाटगे, रघू पिसे, आदींबरोबर मला खेळण्याचा योग आला. त्याकाळी मला रोव्हर्स कप खेळण्यास मिळाला. मी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विविध मैदानांत खेळलो. हा मान मला केवळ फुटबॉलमुळे मिळाला. आजच्या मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी सर्व सोयीसुविधा मिळत आहेत. मात्र त्यांना खेळात म्हणावी तशी चमक दाखविता येत नाही. याला सरावातील अनियमितपणा जबाबदार आहे. - शब्दांकन : सचिन भोसले.